Bhagavad-Gita

                         

Buy this in eBook

CONTENTS

1. अर्जुनाची द्विधा मनस्थिती.. 5

सैन्याच्या सेनापतींची ओळख.. 5

अर्जुनाला सैन्याची पाहणी करायची आहे. 6

अर्जुनाची द्विधा मनस्थिती... 7

अर्जुनाने युद्धाच्या दुष्परिणामांचे वर्णन करत आहे. 7

जेव्हा मार्ग कठीण होतो, अगदी कणखर लोकही चुकीच्या मार्गाने जावू शकतात. 8

2. अलौकिक ज्ञान. 8

अर्जुन युद्धाविरूद्ध बोलतो... 9

गीतेच्या ज्ञानाचा आरंभ.. 9

आत्मा चिरंतन आहे, शरीर क्षणभंगुर आहे. 10

मृत्यू आणि आत्म्याचे देहांतर. 11

भगवान श्रीकृष्ण अर्जुनला योद्धा म्हणून असलेल्या त्याच्या कर्तव्याची आठवण करुन देतात  11

कर्मयोगाचे महत्व, नि: स्वार्थ सेवा... 12

वेद जीवनातील भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाबींचा अभ्यास करतात. 12

कर्मयोगाचा सिद्धांत आणि सराव. 13

स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे.. 14

अनियंत्रित इंद्रियांचे धोके.. 15

इंद्रिय नियंत्रण आणि आत्म-ज्ञानाद्वारे शांती आणि आनंदाची प्राप्ती... 15

3. कर्मयोगाचा मार्ग. 16

एखाद्याने इतरांची सेवा का करावी?. 17

एकमेकांना मदत करणे ही निर्मात्याची पहिली आज्ञा आहे. 17

नेत्यांनी उदाहरण तयार करावे. 18

सर्व कर्मे ही निसर्गाची कर्मे आहेत. 19

आत्मसाक्षात्काराच्या मार्गातील दोन मोठे अडथळे.. 19

काम हा पापाची उत्पत्ती आहे. 20

काम कसा नियंत्रित करावा... 20

4. ज्ञानासह सर्वसंग परित्यागाचा मार्ग. 20

भगवंताच्या अवताराचा उद्देश.. 21

उपासना आणि प्रार्थनेचा मार्ग. 21

संलग्न, अलिप्त आणि निषिद्ध कर्म. 22

कर्मयोगी कर्माच्या नियमांच्या अधीन नाही.. 22

वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यात्मिक पद्धती... 23

अलौकिक ज्ञान मिळवणे ही एक श्रेष्ठ आध्यात्मिक पद्धत आहे. 24

कर्मयोगींवर अलौकिक ज्ञान स्वयंचलितपणे प्रकट होते. 25

निर्वाणासाठी अलौकिक ज्ञान आणि कर्मयोग या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. 25

5. संन्यासाचा मार्ग. 25

दोन्ही पथ परमात्म्याकडे पोहोचतात. 26

एक कर्मयोगी भगवंतासाठी कार्य करतो... 26

आत्म-ज्ञानाचा मार्ग. 27

प्रबुद्ध व्यक्तीची अतिरिक्त लक्षणे.. 27

तिसरा मार्ग --- भक्तीपूर्ण ध्यान आणि चिंतनाचा मार्ग. 28

6. ध्यानाचा मार्ग. 28

योग आणि योगी ची व्याख्या..... 29

मन एक मित्र आणि शत्रू दोन्हीही आहे. 29

ध्यानाची तंत्रे. 30

योगी कोण आहे?. 31

मनाला नियंत्रित करण्याच्या दोन पद्धती... 32

अयशस्वी योग्याचे गंतव्य... 32

उत्तम योगी कोण आहे?. 33

7. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. 33

पदार्थ, चैतन्य आणि आत्मा यांची परिभाषा... 34

परमात्मा हा प्रत्येक गोष्टीचे मूळ असतो... 34

कोण देव शोधतो?. 35

देव कोणत्याही प्रकारच्या उपासनेम्ध्ये प्रतिमेच्या स्वरूपात दिसू शकतो... 35

8. चिरंतन आत्मा.... 36

परमात्मा, आत्मा, स्वतंत्र आत्मा आणि कर्म यांची व्याख्या..... 37

पुनर्जन्म आणि कर्माचा सिद्धांत. 37

ईश्वर-प्राप्तीची एक सोपी पद्धत. 37

मृत्यूच्या वेळी देवाचे ध्यान करून मोक्ष मिळव. 38

निर्मितीतील प्रत्येक गोष्ट चक्रीय आहे. 38

निर्वानाचे दोन मूलभूत मार्ग. 39

अलौकिक ज्ञान मुक्तीकडे नेते. 39

9.  परमगोपनीय ज्ञान. 40

परात्पर स्वरूपाचे ज्ञान हे परम रहस्य आहे. 40

उत्क्रांती आणि चक्रव्यूहाचा सिद्धांत. 40

ज्ञानी आणि अज्ञानी लोकांचे मार्ग. 41

सर्व काही परमात्म्याची अभिव्यक्ती आहे. 41

भक्ती प्रेमाद्वारे मोक्षप्राप्ति... 42

परमेश्वर प्रेम आणि भक्तीने अर्पण केलेले स्वीकारतो आणि ग्रहण करतो... 43

कोणीही अक्षम्य पापी नाही.. 43

भक्तीमय प्रेमाचा मार्ग सोपा आहे. 43

10.  परिपूर्णतेचे प्रकटीकरण. 44

देव प्रत्येक गोष्टीचे मूळ आहे. 44

देव आपल्या भक्तांना ज्ञान देतो... 44

वास्तवाचे वास्तविक स्वरुप कोणालाही माहिती नसते. 45

सर्व काही परिपूर्णतेची अभिव्यक्ती आहे. 45

दैवी अभिव्यक्तींचे थोडक्यात वर्णन. 46

अभिव्यक्त स्वरूप हा परिपूर्णतेचा अगदी लहान भाग आहे. 47

11. विश्वरूपदर्शन. 47

ईश्वराची दृष्टी हे साधकाचे अंतिम लक्ष्य आहे. 47

भगवान श्रीकृष्ण आपले वैश्विक रूप दाखवतात. 48

देव पाहण्यास व्यक्ती तयार किंवा पात्र नाही.. 48

विश्व रूप पाहून अर्जुनाला भय वाटत आहे. 49

आपण फक्त एक दैवी साधन आहोत. 50

व्यक्ती कोणत्याही स्वरूपात देव पाहू शकते. 52

देव भक्तीयुक्त प्रेमाने पाहिला जाऊ शकतो... 52

12. भक्तीचा मार्ग. 53

एखाद्याने वैयक्तिक की असामान्य देवाची उपासना करावी?. 53

भगवंताच्या वैयक्तिक स्वरूपाची उपासना करण्याची कारणे.. 53

भगवंताकडे जाण्याचे चार मार्ग. 53

कर्मयोग हा उत्तम मार्ग आहे. 54

भक्ताची वैशिष्ट्ये..... 54

एखाद्याने ईश्वरी गुण विकसित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे.. 55

13. निर्माण आणि निर्माणकर्ता.. 55

निर्माणाचा सिद्धांत. 55

निर्वाणाचे साधन म्हणून चौपदरी उदात्त सत्य... 55

ईश्वराचे वर्णन बोधकथेद्वारे केले जाऊ शकते आणि इतर कोणत्याही प्रकारे नाही.. 56

परमात्मा, आत्मा, भौतिक प्रकृती आणि स्वतंत्र आत्म्याचे वर्णन. 57

केवळ श्रद्धेने निर्वाण होऊ शकते. 57

आत्म्याचे गुणधर्म. 58

14. प्रकृतीचे तीन गुण. 59

सर्व प्राणी आत्मा आणि पदार्थांच्या संगतीतून जन्माला येतात. 59

भौतिक प्रकृतीचे तीन गुण आत्म्याचे शरीराशी बंधन कसे करतात. 59

प्रकृतीच्या तीन गुणांची वैशिष्ट्ये..... 60

आत्म्याच्या स्थानांतरणाची वाहने देखील त्रिगुण आहेत. 60

भौतिक प्रकृतीचे तीन गुण ओलांडल्यानंतर निर्वाण मिळवा... 60

तीन गुणांच्या वर येण्याची प्रक्रिया... 61

भक्तीयुक्त प्रेमाने तीन गुणांचे बंध कापले जाऊ शकतात. 61

15. पुरूषोत्तम योग. 61

सृष्टी ही मायेच्या सामर्थ्याने तयार केलेल्या वृक्षासारखे आहे. 62

आसक्तीचा वृक्ष कसा कापून मोक्ष प्राप्त करावा... 62

मूर्त आत्मा आनंददायक आहे. 62

आत्मा हा प्रत्येक गोष्टीचे सार आहे. 63

सर्वोच्च आत्मा, आत्मा आणि निर्मित प्राणी काय आहेत?. 63

16. दैवी आणि आसुरी गुणधर्म. 64

तारणाकरिता जोपासल्या जाणाऱ्या प्रमुख दैवी गुणांची यादी.. 64

जे सोडायला हवे अशा आसुरी गुणांची यादी.. 64

केवळ दोन प्रकारचे मनुष्य आहेत: शज्ञानी आणि अज्ञानी... 65

दुःख हे अज्ञानींचे नशिब असते. 66

काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. 66

17. श्रद्धेचे तीन प्रकार. 66

श्रद्धेचे तीन प्रकार. 67

अन्नाचे तीन प्रकार. 67

तीन प्रकारचे यज्ञ.. 67

विचार, शब्द आणि कृती यांची तपस्या.... 68

तीन प्रकारची तपस्या.... 68

तीन प्रकारचे दान. 68

भगवंताची तीन नावे. 69

18. अहंकाराचा त्याग करून मुक्ती मिळवणे. 69

संन्यास आणि त्याग यांची परिभाषा... 69

तीन प्रकारचे त्याग. 70

कर्माची पाच कारणे.. 70

तीन प्रकारचे ज्ञान. 71

कर्माचे तीन प्रकार. 71

कर्त्याचे तीन प्रकार. 71

बुद्धीचे तीन प्रकार. 72

तीन प्रकारचे संकल्प आणि मानवी जीवनाची चार उद्दीष्टे. 72

सुखाचे तीन प्रकार. 72

श्रम विभागणी व्यक्तीच्या क्षमतेवर आधारित आहे. 73

कर्तव्य, शिस्त आणि भक्तीद्वारे मोक्ष मिळविण्याचा प्रयत्न.. 73

कार्मिक बंधन आणि मुक्त इच्छा..... 75

शरण जाणे हाच परमात्म्याकडे जाण्याचा अंतिम मार्ग आहे. 75

परमेश्वराची सेवा आणि सर्वोत्तम दान. 76

गीतेतील ज्ञान. 76

ज्ञान आणि कर्म दोन्ही आवश्यक आहेत. 77

 

भगवद-गीता श्लोकार्थ

(मराठीमध्ये भगवत गीतेतील श्लोक)

(IGS द्वारे इंग्रजी अनुवाद)

www.gita-society.com

 

1. अर्जुनाची द्विधा मनस्थिती

महाराज धृतराष्ट्र म्हणाला: हे संजय, कुरुक्षेत्राच्या पवित्र क्षेत्रात जमलेले आणि लढाईसाठी उत्सुक असलेल्या, माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले आहे? (1.01) संजय म्हणाला: पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना पाहून, राजा दुर्योधन आपल्या आचार्यांकडे जावून म्हणाला: (1.02) हे गुरुदेव, पंडूच्या मुलांच्या या शक्तिशाली सैन्याकडे पाहा, ज्याची व्ह्यूहरचना आपल्या अत्यंत बुद्धिमान शिष्य – (धृष्टद्युम्न) याने केली आहे. त्यांच्याकडे अनेक महान योद्धे, शूरवीर, नायक आणि शक्तिशाली धनुर्धर आहेत. मी आपल्याला त्यांच्यापैकी काहींची नावे सांगतो. (1.03-06) हे देखील लक्षात घ्या की, अनेक उत्तम वीर आपल्या बाजूला आहेत.

सैन्याच्या सेनापतींची ओळख

(दुर्योधन पुढे म्हणतो) मी माझ्या सैन्याचे सेनापती आणि इतर अनेक वीरांची नावे घेईन, जे माझ्यासाठी स्वत:च्या जीवावर उदार झालेले आहेत. ते वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि सर्वजन युद्ध कलेमध्ये निपुण आहेत. (1.07-09) आपले सैन्य अजिंक्य आहे, त्यामुळे त्यांच्या सेनेवर विजय मिळवणे सोपे आहे. म्हणूनच, तुम्ही सर्वजण नेमून दिलेल्या ठिकाणी उभे राहून, आपले सेनापती भीष्म यांचे संरक्षण करा. (1.10-11) कुरु घराण्यातील सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या भीष्मांनी सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख फुंकताच दुर्योधनाला आनंद झाला. (1.12) त्यापाठोपाठ, शंख, नगारे, झांजा, ढोल आणि रणशिंग एकत्र वाजविले जात होते. त्यांचा ध्वनी अति प्रचंड होता. (1.13) त्यानंतर शुभ्र अश्वांनी सुसज्ज, भव्य रथामध्ये आरूढ असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख फुंकले. (1.14) कृष्णाने आपला शंख फुंकला; त्यानंतर अर्जुन आणि सैन्याच्या इतर सर्व विभागातील सेनापतींनी आपापले शंख फुंकले. पृथ्वी आणि अवकाशात झालेल्या त्या अति प्रचंड गर्जनेने कौरवांची मने विदीर्ण झाली. (1.15-19)

अर्जुनाला सैन्याची पाहणी करायची आहे

कौरवांना उभे असलेले पाहून आणि शस्रास्रांचा वार करून आता युद्ध सुरू होणार असे असतांना, ज्याच्या रथाच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे, अशा अर्जुनाने धनुष्य उचलले आणि तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला: हे परमेश्वरा, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेवून उभा कर, जेणेकरून येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्रास्रस्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मला पाहू देत. (1.20-22) जे लोक लढाईसाठी एकत्र होवून वाईट विचारांच्या कौरवांची साथ देत आहेत, त्यांना खुश करत आहेत अशांना पहावे ही माझी इच्छा आहे. (1.23) संजय म्हणाला: हे राजन, भगवान श्रीकृष्णांनी, अर्जुनाने विनंती केल्याप्रमाणे भिष्म, द्रोण आणि इतर सर्व राजांच्या दोन्ही सैन्याच्या मधोमध तो सर्वोत्तम रथ उभा केला आहे आणि अर्जुनाला सांगितले: युद्धासाठी जमलेल्या या सर्वकौरवांना पाहा! (1.24-25) तेथे अर्जुनाला आपले काका, आजोबा-पणजोबा, गुरु, मामा, भाऊ, मुले, नातवंडे आणि स्वजन दिसतात. (1.26)

अर्जुनाची द्विधा मनस्थिती

सासरे, सोबती आणि आपले सर्व आप्तजन दोन्ही सैन्याच्या परस्पर विरुद्ध गटात उभे असलेले पाहून अर्जुनाला खूप वाईट वाटले आणि दुःखाने तो म्हणाला: हे कृष्णा, युद्धासाठी प्रतिस्पर्धी असलेल्या माझ्या आप्तजणांना पाहून माझे गात्र गळून गेले आहे आणि माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. माझे शरीर थरथरले आहे आणि माझ्या शरीराला कंप सुटला आहे. (1.27-29) माझ्या हातातून धनुष्य गळून पडत आहे आणि माझ्या अंगाची लाही लाही होत आहे. माझे मस्तक झुकले आहे, मी स्थिर उभे राहण्यास असमर्थ आहे, आणि हे कृष्णा, मला अशुभ संकेत मिळत आहेत. युद्धामध्ये माझ्याच नातलगांना ठार मारण्यामध्ये ला काहीही स्वारस्य वाटत नाही. (1.30-31) हे कृष्णा, मला ना विजयाची, ना आनंदाची ना राज्याची इच्छा आहे. हे कृष्णा, हे असे राज्य, आनंद किंवा जीवनाचा काय उपयोग आहे? कारण ज्यांच्यासाठी आपण राज्य, आनंद आणि सुख मिळवू इच्छितो ते सर्व --- आपले जीवन आणि संपत्ती सोडून लढाईसाठी इथे उभे आहेत. (1.32--33) तीनही लोकांच्या सार्वभौमत्वासाठीसुद्धा, माझे गुरुजन, काका, मुले, आजोबा, मामा, सासरे, नातू, मेहुणे आणि इतर आप्तजणांना मारण्याची माझी इच्छा नाही तर एका पृथ्वीवरील राज्यासाठी मी हे कसे करू. (1.34-35)

हे भगवान श्रीकृष्ण, धृतराष्ट्राच्या या पुत्रांची हत्या करण्यात आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे? या अपराध्यांची हत्या केल्यानंतर देखील आमच्या पदरी केवळ पापाचाच संचय होईल. (1.36) म्हणूनच, आम्ही आमच्या चुलतभावांना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना ठार मारू नये. हे कृष्णा, आपल्याच आप्तजणांना ठार मारल्यानंतर आम्ही सुखी कसे होऊ शकतो? (1.37) जरी ते लोभामुळे आंधळे झाले असले तरीही, कुटूंबियांच्याच नाशामुळे होणारे पाप किंवा मित्रांचा विश्वासघात केल्याने होणारे दोष त्यांना दिसत नाही, परंतु कुटुंबाचा विनाश करताना स्पष्टपणे आम्हाला पाप दिसत असेल तर हे कृष्णा, आम्ही परत मागे फिरण्याचा विचार का करू नये? (1.38-39)

अर्जुनाने युद्धाच्या दुष्परिणामांचे वर्णन करत आहे

एखाद्या कुळाच्या नाशामुळे परंपरागत कुळाचार आणि कूळधर्म नष्ट होतात. कौटुंबिक परंपरा नष्ट झाल्यामुळे उर्वरित कुटुंबात अनैतिकता तयार होते. (1.40) आणि जेव्हा अनैतिकता व्यापून टाकते तेव्हा हे कृष्णा, त्या कुटुंबातील स्रिया दूषित होतात; जेव्हा कुटुंबातील स्रिया दूषित होतात, तेव्हा अनेक सामाजिक समस्या उत्पन्न होतात. (1.41) याने कुळ आणि कुळ परंपरा नष्ट करणारे नरकात जातात, कारण पिंड आणि जलअर्पणापासून वंचित झाल्यामुळे त्यांच्या पूर्वजांचे / पितर आत्मे अधोगतीला जाताल (1.42) जे आपलीच कुळे नष्ट करतात त्यांची शाश्वत सामाजिक सुव्यवस्था आणि त्यांचे कौटुंबिक परंपरेतील सार्वकालिक गुण त्यांच्याच अनैतिकतेच्या पापी कृतीने नष्ट होतात. (1.43) हे कृष्णा, आम्हाला असेही सांगण्यात आले आहे की कुलपरंपरेचा विध्वंस करणारे लोक दीर्घ काळ नरकात खितपत पडतात. (1.44)

 

जेव्हा मार्ग कठीण होतो, अगदी कणखर लोकही चुकीच्या मार्गाने जावू शकतात

अरेरे! राज्यसुख भोगण्याच्या लोभामुळे आम्ही आमच्याच आप्तजनांना ठार मारण्याच्या प्रयत्नातून मोठे पाप करण्यास तयार झालो आहोत. (1.45) शस्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या नि:शस्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. (1.46) संजय म्हणाला: रणांगणावर शोकाकुल झालेला अर्जुन धनुष्य-बाण टाकून देवून रथाच्या आसनावर जावून बसला आहे. (1.47)

2. अलौकिक ज्ञान

संजय म्हणाला: अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या आणि निराश झालेल्या अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. (2.01) परम भगवान म्हणाले: या क्षणी तू असा उदास कसा झालास? मनाने आणि कर्माने शुद्ध असलेल्या व्यक्तीस हे शोभनीय नाही. हे निंदनीय आहे आणि हे अर्जुना, अशाने तू स्वर्गात जावू शकणार नाहीस. (2.02) हे अर्जुन, भ्याड होऊ नकोस, कारण तसे करणे तुला शोभत नाही. आपल्या अंत:करणाचे असे तुच्छ दुबळेपण दूर कर आणि हे अर्जुना, युद्धासाठी सज्ज हो. (2.03)

 

अर्जुन युद्धाविरूद्ध बोलतो

अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, मला पूजनीय असलेल्या भीष्म आणि द्रोण यांच्यावर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन? (2.04) या महान गुरूंना मारण्यापेक्षा या जगात भिक्षा मागून राहणे अधिक श्रेयस्कर होईल, कारण त्यांना ठार मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या संपत्तीचा आणि सुखांचा आनंद मी कसा घेवू शकेल. (2.05) कोणता पर्याय निवडायचा, युद्ध करायचे की नाही करायचे? आमच्यासाठी अधिक चांगले काय आहे. याहीपुढे, आम्हाला हे ही ठावूक नाही की आम्ही जिंकू की ते आमच्यावर विजय मिळवतील. आमच्यासमोर उभे असणार्‍या धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारल्यानंतर, खरे तर आम्ही जगण्याची इच्छासुद्धा करू नये. (2.06)

करुणेच्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्यांबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझे मन कर्तव्याप्रति गोंधळून गेले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, निर्णायकपणे, माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते मला सांगावे कारण मी तुमचा शिष्य आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा. (2.07) मला याचे आकलन होत नाही की या पृथ्वीवरील एक अतुलनीय आणि समृद्ध राज्य मिळवून किंवा स्वर्गातील देवांवर अधिराज्य गाजवून सुद्धा माझ्या इंद्रियांना शुष्क / कोरडे करणारे हे दु: ख नाहीसे कसे होईल. (2.08) संजय म्हणाला: हे राजा, भगवान श्रीकृष्णाला हे सांगून झाल्यानंतर पराक्रमी अर्जुनाने कृष्णाला म्हटले: मी युद्ध करणार नाही आणि तो स्तब्ध झाला. (2.09) हे राजा, भगवान श्रीकृष्ण, जणू काही स्मित करत, दोन सैन्याच्यामध्ये उभे राहून, दु: खी झालेल्या अर्जुनाला म्हणाले. (2.10)

गीतेच्या ज्ञानाचा आरंभ

सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाले: जे शोक करण्यायोग्य नाहीत त्याबद्दल तू शोक करीत आहेस; आणि तरी पंडितांप्रमाणे युक्तिवाद करत आहेस. ज्ञानीजन जिवीत किंवा मृतांबद्दल कधीही शोक करीत नाहीत. (2.11) असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा हे सम्राट, तू किंवा मी अस्तित्त्वात नव्हतो किंवा भविष्यकाळातही आपले अस्तित्व कधीही संपुष्टात येणार नाही/आपण कधीही अस्तित्त्वविहीन होणार नाही. (2.12) ज्याप्रमाणे कोणताही सजीव (आत्म्या, जीव, जीवात्मा) या आयुष्यामध्ये बालपण, तरूण शरीर आणि वृद्धापकाळात वेगवेगळे शरीर प्राप्त करतो; त्याचप्रकारे, मृत्यूपश्चात जीवात्मा दुसरे शरीर प्राप्त करतो. ज्ञानी जनांना हे सर्व माहित आहे. (15.08 देखील पाहा) (2.13) इंद्रियांचा विविध वस्तूंशी संपर्क आला की उष्णता आणि थंडी, सुख-दु:ख या भावना जन्म घेतात. त्या क्षणिक आणि तात्कालिक असतात. म्हणून हे अर्जुना, (2.14) त्यांना सहन करणे शिकून घे, कारण एक धीर मनुष्य / शांत व्यक्ती --- जो या इंद्रिय वस्तूंनी ग्रासलेला नाही, आणि सुख-दु:ख अशा दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर आहे - हे अर्जुना, त्यालाच मोक्ष प्राप्ती होवू शकते. (2.15)

आत्मा चिरंतन आहे, शरीर क्षणभंगुर आहे

अदृश्य आत्मा (सत्, आत्म्या) चिरंतन आहे आणि दृश्यमान जग (भौतिक शरीरासह) क्षणिक आहे. या दोघांची वास्तविकता नक्कीच तत्वदर्शी पुरुषांनी पाहिलेली आहे. (2.16) आत्मा (आत्म्यास) ज्याद्वारे हे सर्व विश्व/शरीर व्यापलेले आहे, अविनाशी आहे. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. (2.17) चिरंतन, अपरिवर्तनीय आणि अनाकलनीय आत्म्याचे शरीर नाशवंत आहे. म्हणून, हे अर्जुना, युद्ध कर. (2.18) जो या आत्म्याला मारणारा असे समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे समजतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारत नाही कोणाकडूनही मारला जात नाही. (2.19) आत्मा जन्माला येत नाही आणि तो मरतही नाही. तो अस्तित्वात येत नाही, किंवा त्याचे अस्तित्त्व नष्ट होत नाही. तो अजन्मा, चिरंतन, नित्य आणि पुरातन आहे. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा आत्मा नष्ट होत नाही. (2.20) हे अर्जुना, आत्मा अविनाशी, चिरंतन, अजन्मा आणि पुरातन आहे हे ज्याला माहित आहे, तो कोणालाही ठार कसा करेल किंवा मारण्यासाठी कारण कसा बनेल? (2.21)

मृत्यू आणि आत्म्याचे देहांतर

ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती जुन्या वस्रांचा त्याग करून नवीन वस्र परिधान करतो; त्याचप्रमाणे, जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. (2.22) आत्म्यावर शस्र वार करू शकत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे भिजविता येत नाही आणि वाऱ्याद्वारे सुकविताही येत नाही. आत्मा तुटू शकत नाही, जळू शकत नाही, त्यास भिजविणे किंवा सुकविणे शक्य नाही. तो चिरंतन, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, अचल आणि पुरातन आहे. (2.23-24) आत्मा अवर्णनीय, अनाकलनीय आणि अपरिवर्तनीय आहे.

आत्म्या असा आहे हे जाणल्यानंतर, तू दु: खी होऊ नकोस. (2.25) जरी तुला असे वाटते की हा जीव किंवा शरीर जन्म घेते आणि कायमस्वरूपी मृत होते, तरीसुद्धा हे अर्जुना, तू असा शोक करु नये. कारण जन्मलेल्या प्रत्येकासाठी मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणूनच, तू या अपरिहार्यतेबद्दल शोक करु नये. (2.26-27) हे अर्जुना, जन्माच्या आधी आणि मृत्यूनंतर --- सर्वत्र निर्विकार आहे --- आपल्या डोळ्यांसाठी अव्यक्त आहे. शरीर केवळ जन्म आणि मृत्यू दरम्यान प्रकट होते. दु: ख नक्की कशाबद्दल आहे? (2.28) काहीजण या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, काही लोक त्याचे अद्भुत वर्णन करतात, तर इतर जण आश्चर्य म्हणून ऐकतात. याबद्दल ऐकल्यानंतरही फारच थोडे लोक त्याला जाणू शकतात. (2.29) हे अर्जुना, ज्याने संपूर्ण शरीर व्यापले आहे असा आत्मा चिरंतन अविनाशी आहे. म्हणून, तू कोणासाठीही शोक करू नये. (2.30)

भगवान श्रीकृष्ण अर्जुनला योद्धा म्हणून असलेल्या त्याच्या कर्तव्याची आठवण करुन देतात

क्षत्रिय म्हणून तुझे कर्तव्य लक्षात घेता तू डगमगून जावू नये. कारण क्षत्रियासाठी, धर्म तत्वाकरिता युध्द करण्याशिवाय दुसरे चांगले काहीच नाही. (2.31) हे अर्जुना, केवळ भाग्यवान योद्ध्यांनाच, स्वर्गातील दारे खुली करणारी युद्धाची संधी अनपेक्षितपणे मिळते. (2.32) जर हे धर्म युद्ध तू लढला नाहीस, तर तू तुझ्या कर्तव्यांमध्ये अपयशी ठरशील, प्रतिष्ठा गमवशील आणि पापाचा धनी होशील. (2.33) लोक तुझी नेहमी निंदा करतील. सन्मान्य व्यक्तींसाठी, दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. (2.34) थोर योद्धे असा विचार करतील की तू भीतीमुळे युद्धातून माघार घेतलीस. जे तुझा अत्यंत आदर करतात, त्यांच्या मनातील तुझ्याविषयीचा आदर नाहीसा होईल. (2.35) तुझे शत्रू अपमानास्पद शब्दांत तुझा अपमान करतील. यापेक्षा तुला अधिक दु:खदायक काय असू शकते? (2.36) (कर्तव्यपथावर असतांना) मृत्यू झाल्यास तू स्वर्गात जाशील किंवा विजयी झाल्यास पृथ्वीचे साम्राःज्य उपभोगशील. म्हणून, अर्जुना, युद्ध करण्याच्या दृढनिश्चयाने ऊठ. (2.37) सुख आणि दु:ख, लाभ आणि हानी, आणि जय आणि पराजय यांना समान मानून युद्ध कर. अशाप्रकारे आपले कर्तव्य केल्याने तुला पाप लागणार नाही. (2.38)

कर्मयोगाचे महत्व, नि: स्वार्थ सेवा

हे अर्जुना, तुला दिव्य ज्ञान प्रदान केले आहे. आता कर्मयोग, निस्वार्थ सेवा यांची महती ऐक, जे सांगितल्यामुळे तू तुझ्या कर्माच्या बंधनातून मुक्त होशील (कर्म). (2.39) कर्मयोगामध्ये कोणतेही प्रयत्न कधीही निष्फळ ठरत नाही आणि त्यांचा प्रतिकूल परिणामही होत नाही. या मार्गाचा थोडासा अभ्यास देखील व्यक्तीला जन्म आणि मृत्यूच्या मोठ्या भयापासून वाचवतो. (2.40) कर्मयोगी व्यक्तीची बुद्धी ईश्वरी-प्राप्तीसाठी दृढ असते, हे अर्जुना, परंतु जे कर्माच्या फळाची उपभोग घेण्याची इच्छा करतात, त्यांच्या इच्छा अंतहीन असतात आणि त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले आहेत. (2.41)

 

वेद जीवनातील भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाबींचा अभ्यास करतात

ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, ते वेदांचा खरा अर्थ समजून न घेता, त्यातील आलंकारिक शब्दांमध्ये आनंद मानतात --- हे अर्जुना, विचार कर, जणू काही वेदांमध्ये स्वर्गीय आनंद प्राप्त करण्याच्या विधींखेरीज अन्य काहीही नाही. (2.42) ते भौतिक वासनेच्या आहारी जातात आणि स्वर्ग प्राप्ती हे जीवनाचे सर्वोच्च ध्येय मानतात. ते भोग आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी विशिष्ट विधी करतात. त्यांच्या कर्माचा पुनर्जन्म हाच परिणाम आहे. (2.43) जे लोक आनंद आणि सामर्थ्याशी संलग्न होतात आणि ज्यांचा न्याय अशा विधीवादी क्रियाकलापांमुळे अस्पष्ट होतो अशा लोकांच्या मनात आत्म-प्राप्तीचा दृढ निश्चय तयार होत नाही. (2.44) वेदांचा एक भाग भौतिक स्वरुपाच्या तीन रीती किंवा दशा (गुण) यांच्याशी संबंधित आहे. हे अर्जुन, सर्व द्वंद्वातून मुक्त हो; लाभ आणि रक्षण करण्याच्या यांच्या काळजीतून मुक्त होवून नेहमी संतुलित राहा आणि चिंता करू नको. तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो आणि आत्म-परायण हो. (2.45) जेव्हा विशाल तलावाचे पाणी उपलब्ध होते तेव्हा पाण्याच्या लहानसे जलाशय जितके उपयुक्त असते त्याचप्रमाणे आत्मज्ञान असलेल्या व्यक्तीसाठी वेदांची तितकीच गरज उरते. (2.46)

कर्मयोगाचा सिद्धांत आणि सराव

तुला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर कोणतेही नियंत्रण किंवा दावा नाही. कर्माचे फल हा तुझा हेतू असू नये. तू कधीही निष्क्रीय होऊ नयेस. (2.47) हे अर्जुना, तू सर्व शक्तीनिशी तुझे कर्म कर. तुझ्या मनाची परमेश्वराशी निष्ठा ठेवून, चिंता आणि कर्मफलाबद्दल स्वार्थी आसक्ती न ठेवता यश आणि अपयश दोन्हीमध्येही शांत राहा. मनाच्या या समत्वभावाला कर्मयोग म्हणतात. (2.48) स्वार्थाच्या हेतूने केलेले कार्य हे निःस्वार्थ सेवा किंवा कर्मयोगापेक्षा अत्यंत निंद्य आहे. म्हणून, हे अर्जुना, कर्मयोगी हो. जे लोक केवळ आपल्या कर्माच्या फलांचा आनंद उपभोगण्यासाठी कार्य करतात ते खरे तर कृपण असतात. (कारण फलांवर कोणाचेच नियंत्रण नाही). (2.49)

एक कर्मयोगी या जीवनातच चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून समत्वरूप कर्मयोगाला चिकटून राहा. कर्माच्या फलाची आसक्ती न ठेवता आपल्या सर्वोत्कृष्ट क्षमतेनिशी कार्य करणे म्हणजे कर्मयोग. (2.50) सर्व कर्मांच्या फलांबद्दलच्या स्वार्थी आसक्तीचा त्याग करून, ज्ञानी कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतात आणि परमानंदी दैवी स्थिती प्राप्त करून घेतात. (2.51) जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकले आहे आणि शास्त्रांमधून जे सर्व ऐकावयाचे आहे त्याबद्दल उदासीन होशील. (2.52)

जेव्हा तुझी विवादास्पद मते आणि वेदांच्या विधीवादी शिकवणीमुळे गोंधळलेली बुद्धी, परमात्म्यावर लक्ष केंद्रित करण्यावर स्थिर आणि दृढ होईल, तेव्हाच तुला परमात्मामधील दिव्य भावनेची प्राप्ती होईल. (समाधी) (2.53) अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, ज्या ज्ञानी व्यक्तीची बुद्धी स्थिर असते, त्याची लक्षणे काय आहेत? स्थिर बुद्धी असणारी व्यक्ती कशी बोलते? अशी व्यक्ती कशी बसते आणि चालते? (2.54)

स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे

परम भगवान म्हणाले: जेव्हा एखादी व्यक्ती मनाच्या सर्व इच्छांपासून पूर्णपणे मुक्त होते आणि शुद्ध झालेले मन (ब्रह्मा) आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट होते, तेव्हा हे अर्जुना, त्याला एक स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणतात. (2.55) ज्या व्यक्तीचे मन दु: खाने क्षुब्ध झालेले नसते, ज्याला सुखांची इच्छा नसते आणि जो आसक्ती, भीती व क्रोधापासून पूर्णपणे मुक्त असतो त्यांना स्थिर बुद्धीचे, स्थितप्रज्ञ मुनी म्हणतात. (2.56) जे कशाशीही निगडीत नसतात, जे इच्छित परिणाम मिळवण्यामुळे हर्षोल्हासित होत नाही किंवा अवांछित परिणामांनी ज्यांना दु:ख होत नाही, त्यांची बुद्धी स्थिर मानली जाते. (2.57) ज्याप्रमाणे एखादे कासव संरक्षणासाठी कवचामध्ये आपल्या अवयव ओढून धरते त्याचप्रमाणे जी व्यक्ती जेव्हा सर्व इंद्रिय विषयांपासून आपली इंद्रिये आवरून घेते, तेव्हा अशा व्यक्तीची बुद्धी स्थिर मानली जाते. (2.58) जरी एखादी व्यक्ती इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाली तरी इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच. परमात्म्याच्या साक्षात्काराने या इच्छा नाहीशा होतात. (2.59)

अनियंत्रित इंद्रियांचे धोके

हे अर्जुना, परिपूर्णतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या विवेकी पुरुषाचे मन सुद्धा त्याला जबरदस्तीने ओढून नेतात. (2.60) इंद्रियांना नियंत्रणात आणल्यानंतर एखाद्याने प्रेमळ चिंतनाने त्याचे मन माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करावे. ज्याचे इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण असते त्याचीच बुद्धी स्थिर होते. (2.61) इंद्रिय वस्तूंबद्दल चिंतन करणाऱ्या व्यक्तीची इंद्रिय वस्तूंशी आसक्ती वाढत जाते. इंद्रिय वस्तूंची इच्छा ही इंद्रिय वस्तूंच्या आसक्तीतून येते आणि इच्छापूर्ती न झाल्यास क्रोध निर्माण होतो. (2.62) क्रोधामधून गैरसमज किंवा अविचार निर्माण होतात. गैरसमजातून मन भ्रमित होतो. मन भ्रमित झाले की तर्क नष्ट होतो. जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्ती योग्य मार्गापासून खाली येते, व्यक्तीचे अध: पात होते. (2.63)

इंद्रिय नियंत्रण आणि आत्म-ज्ञानाद्वारे शांती आणि आनंदाची प्राप्ती

एक स्थितप्रज्ञ व्यक्ती, इंद्रियांना नियंत्रित ठेवण्यामध्ये समर्थ आणि आसक्ती-अनासक्ती यांपासून मुक्त असणारी व्यक्ती, इंद्रिय वस्तूंचा आनंद घेतो आणि प्रसन्नता प्राप्त करते. (2.64) शांतता-प्राप्तीनंतर सर्व दुःख नष्ट होतात. अशा शांत व्यक्तीची बुद्धी लवकरच पूर्णपणे स्थिर होते आणि परमात्म्याशी एकरूप होते. (2.65) जे लोक शाश्वत परमात्म्यात लीन होत नाहीत त्यांना आत्मज्ञान किंवा आत्मजान नसते. आत्म-ज्ञानाशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय सुख मिळू शकत नाही. (2.66)

एखादे वादळ ज्याप्रमाणे समुद्रातील एखादी नौका आपल्या गंतव्यस्थानापासून जसे दूर घेवून जाते त्याचप्रमाणे – भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंदित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. (2.67) म्हणून, हे अर्जुना, इंद्रियविषयांपासून पूर्णपणे इंद्रिये जेव्हा आवरून घेतली जातात, तेव्हा व्यक्तीची बुद्धी स्थिर होते. (2.68) जेव्हा इतर सर्वांसाठी रात्री असतो तेव्हा आत्मसंयमी असणारा योगी जागृत असतो. सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती योगींसाठी रात्र असते. (2.69) (बहुतेक लोक झोपेच्या अधीन असतात आणि रात्री झोपेमध्ये स्वप्नांतील जगात योजना आखत असतात, योगी जगात राहून जगापासून अलिप्त राहतो.)

ज्याप्रमाणे एखाद्या समुद्रामध्ये नदीचे पाणी त्याला विचलीत न करता सामावून जाते, त्याचप्रमाणे जो मनुष्य अनेक इच्छा मनात येवूनही विचलीत होत नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. ज्याला भौतिक वस्तूंची इच्छा असते तो कधीही शांत नसतो. (2.70) जो सर्व इच्छांचा त्याग करतो आणि उत्कटतेपासून तसेच “मी” आणि “माझे” या भावनेपासून मुक्त होतो तोच शांती प्राप्त करतो. (2.71) हे अर्जुना, ही मनाची अचेतन (ब्राह्मी) अवस्था आहे. या अवस्थेत प्रवेश केल्यामुळे, व्यक्ती भ्रमित होत नाही. मृत्यूच्या अंत: काळी जर एखादा या अवस्थेत स्थिर असेल तर त्या व्यक्तीला ब्रह्मनिर्वाण (भगवद धामास) मिळते. (2.72)

 

3. कर्मयोगाचा मार्ग

अर्जुन म्हणाला: जर तुम्हाला असे वाटते की कर्मापेक्षा अलौकिक ज्ञान घेणे श्रेष्ठ आहे तर हे कृष्णा, मग तुम्ही मला या भयानक युद्धामध्ये गुंतण्याचा आग्रह का करीत आहात? तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. कृपया निश्चितपणे मला सांगा की यापैकी कोणत्या गोष्टीमुळे मला भगवंताची प्राप्ती होईल. (3.01-02) परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की या जगात, आध्यात्मिक साक्षात्कारासाठी दोन मार्ग अस्तित्वात आहे - चिंतकांसाठी आत्म-ज्ञान (ज्ञानयोग) आणि सक्रियांसाठी निस्वार्थ कर्माचा मार्ग (सेवा, कर्मयोग). (3.03) केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होत नाही. कर्माचा फक्त त्याग केल्याने कोणीही परिपूर्णता प्राप्त करत नाही. (3.04) कोणीही क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही, म्हणूनच प्रत्येकजण निसर्गाच्या शक्तींद्वारे --- असहाय्यपणे - कृती करण्यास प्रवृत्त आहे. (3.05) भ्रमित लोक, जे कर्मेंद्रिय संयमित करतात परंतु मनाने इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असतात, त्यांना मिथ्याचारी म्हटले जाते. (3.06)

एखाद्याने इतरांची सेवा का करावी?

जो प्रशिक्षित व शुध्द मन आणि बुद्धीने इंद्रियांना संयमित करतो आणि नि: स्वार्थ सेवेसाठी इंद्रियांद्वारे कर्म गुंतवून ठेवतो, हे अर्जुना, असा व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. (3.07) तू तुझे नियत कर्म कर, कारण खरोखर निष्क्रिय बसण्यापेक्षा नियत कर्म करणे अधिक श्रेष्ठ आहे. कर्म केल्याशिवाय तुझ्या शरीराचाही निर्वाह होवू शकत नाही. (3.08) जे नि: स्वार्थ सेवा म्हणून केले जावू शकत नाही अशा कर्माद्वारे मनुष्य बांधलेले असतात. म्हणून, हे अर्जुना, कर्माच्या फलांशी स्वार्थीपणे आसक्त होण्यापासून मुक्त होण्याकरिता, माझी सेवा म्हणून तुझे कर्तव्य पूर्ण कार्यक्षमतेने कर. (3.09)

एकमेकांना मदत करणे ही निर्मात्याची पहिली आज्ञा आहे

ब्रह्मा, निर्मात्याने, सुरुवातीला निस्वार्थ सेवा (सेवा, यज्ञ, त्याग) सह मनुष्यांना निर्माण केले आणि म्हणाले: यज्ञाच्याद्वारे तुम्ही तुमचा उत्कर्ष करून घ्या, आणि हा यज्ञ तुमच्या इच्छित मनोरथ पूर्ण करेल. (3.10) नि: स्वार्थ सेवेने स्वर्गीय देवतांना संतुष्ट करा आणि त्या तुमचेही पोषण करतील. अशा प्रकारे एकमेकांचे पोषण केल्याने सर्वांचे परमकल्याण होईल. (3.11) नि: स्वार्थ सेवेद्वारे प्रसन्न झालेल्या देवता तुम्हाला इच्छित भोग प्रदान करतील. पण अशा भोगाच्या बदल्यात पुन्हा देवतांना काहीही अर्पण न करता केवळ उपभोग घेणारा व्यक्ती निश्चितपणे चोरच आहे. (3.12) जे सदाचरणी लोक निस्वार्थी सेवेने अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात, ते सर्व पापांपासून मुक्त होतात, परंतु जे अनाचारी लोक केवळ स्वत:साठीच अन्न शिजवतात (प्रथम मला अर्पण न करता किंवा इतरांसह सामायिक न करता), ते केवळ पापच भक्षण करतात. (3.13) सर्व सजीव अन्नधान्यातून उत्पन्न होतात; धान्य पावसाद्वारे उत्पन्न होते; नि: स्वार्थ सेवा म्हणून कर्तव्य बजावल्यास पाऊस (देवांचा आशीर्वाद म्हणून) येतो. (4.32 देखील पाहा). वेदांमध्ये कर्तव्य निश्चित केले आहे. वेद ब्रह्मा (अनंतकाळचे) पासून आले आहेत. अशा प्रकारे सर्वव्यापी ब्रह्मा सेवेमध्ये सदैव उपस्थित असतात. (3.14-15) जी व्यक्ती यज्ञा संबधी कार्य (सेवा) करून सृष्टीचे चक्र चालू ठेवण्यास मदत करीत नाही आणि जो केवळ आनंददायक सुखाचा उपभोग घेतो, तो पापी मनुष्य व्यर्थ जीवन जगतो, हे अर्जुना. (3.16) आत्म-अनुभवी व्यक्तीसाठी, जो पूर्णपणे संतुष्ट होवून आत्म्यामध्येच रममाण आहे त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही. (3.17) अशा व्यक्तीला जे काही केले जाते किंवा जे केले जात नाही त्यामध्ये काहीच रस नसतो. स्वत: ची जाण असलेली व्यक्ती कशासाठीही (देव वगळता) इतर प्राणिमात्रांवर अवलंबून नसते. (3.18)

नेत्यांनी उदाहरण तयार करावे

म्हणूनच, आपले कर्तव्य नेहमीच कार्यक्षमतेने आणि कर्मफलाप्रति कोणत्याही आसक्तीशिवाय कर, कारण आसक्तीशिवाय कर्म केल्याने परमेश्वर प्राप्ती होते. (3.19) राजा जनक आणि इतरांनी केवळ नि: स्वार्थ सेवा (कर्मयोग) करून परिपूर्णता (किंवा आत्म-साक्षात्कार) प्राप्त केला होता. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि समाजाच्या वैश्विक कल्याणासाठी तू देखील तुझे कर्तव्य बजावले पाहिजे. (3.20) श्रेष्ठ व्यक्ती जे काही करतात त्याचे सामान्यजन अनुसरण करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे आदर्श घालून देते त्यानुसार हे सारे जग कार्य करते. (3.21) हे अर्जुना, तीनही लोकांमध्ये (स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ) माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही आणि मला मिळविण्यास अशक्य असेही काहीही नाही, तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. (3.22) हे अर्जुना जर मी अविरतपणे कर्म केले नाही तर सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. जर मी कर्म केले नाही तर हे जग नष्ट होईल आणि मी या सर्व लोकांच्या गोंधळ आणि विनाशाचे कारण ठरेल. (3.23-24) ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होवून कर्म करावे. (3.25) नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांची मने विचलीत होवू नये, म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यासाठी प्रेरित करू नये. याउलट स्वार्थी आसक्तीशिवाय, भक्तीभावाने सर्व कार्ये कार्यक्षमतेने करुन इतरांना प्रेरित केले पाहिजे. (3.29 देखील पाहा.) (3.26)

सर्व कर्मे ही निसर्गाची कर्मे आहेत

सर्व कार्ये निसर्गाची उर्जा आणि सामर्थ्याने केली जाते, परंतु अज्ञानाच्या भ्रमामुळे लोक स्वतःला कर्माचा कर्ता मानतात. (5.09, 13.29 आणि 14.19 देखील पहा) (3.27) अर्जुना, निसर्गातील शक्ती आणि कार्य यांच्याबद्दल ज्याला ज्ञान आहे, तो कर्माप्रति आसक्त होत नाही, कारण त्याला चांगले ठाऊक असते की निसर्गातील शक्ती --- आपल्या इंद्रियांच्या आधारे कार्य करीत आहे. (3.28) निसर्गाच्या मायावी शक्तीने (माया) अज्ञानी लोक निसर्गाच्या शक्तीने केलेल्या कार्यामध्ये पूर्णपणे मग्न होतात, आसक्त होतात. ज्यांचे ज्ञान अपूर्ण आहे अशा अज्ञानी लोकांना ज्ञानी जणांनी विचलीत करू नये. (3.26 देखील पाहा.) (3.29) तुझे कर्तव्य कर ---- मनाच्या आध्यात्मिक चौकटीत, इच्छा, आसक्ती आणि मानसिक दु: खापासून मुक्त होवून--सर्व कर्म मला समर्पित कर. (3.30) जे कोणी माझ्या या शिकवणीनुसार आपले कर्म करतात - (विश्वासाने (किंवा संपूर्ण लक्ष देऊन आणि प्रामाणिकपणे) आणि द्वेषरहित होवून  - ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धि प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. (3.31-32) सर्व प्राणी त्यांच्या स्वभावाचे अनुसरण करतात. ज्ञानी मनुष्यसुद्धा त्यांच्या प्रकृतीनुसार वागतात. तर मग बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? (3.33)

आत्मसाक्षात्काराच्या मार्गातील दोन मोठे अडथळे

इंद्रियांमध्ये इंद्रिय वस्तूंप्रति आसक्ती आणि विरक्ती असते. एखाद्याने या दोघांच्याही नियंत्रणाखाली येऊ नये कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गातील ते दोन मोठे अडथळे आहेत.(3.34) एखाद्याची निकृष्ट दर्जाची नैसर्गिक धर्म वरिष्ठ अनैसर्गिक धर्मापेक्षा श्रेष्ठ असतात. एखाद्याला नैसर्गिक धर्माचरण करत असतांना आलेला मृत्यू उपयुक्त ठरतो. अनैसर्गिक कर्मामुळे खूप ताण येतो. (18.47 देखील पाहा) (3.35)

काम हा पापाची उत्पत्ती आहे

अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, एखादी व्यक्ती अनिच्छेने आणि इच्छेविरूद्ध जबरदस्तीने पापकर्मे करण्यास कशामुळे उद्युक्त होते? (3.36) सर्वोच्च परमेश्वर म्हणाले: ते कारण म्हणजे काम आहे (किंवा भौतिक आणि लैंगिक सुखांची तीव्र इच्छा), जे उत्कटतेतून जन्म घेते आणि अपूर्ण राहिल्यावर क्रोधात रूपांतरित येतो. काम हा अतृप्त आहे आणि एक भयंकर राक्षस आहे. त्याला शत्रू म्हणून मान. (3.37) ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्ठीला जातो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान या कामाद्वारे आच्छादिला जातो. (3.38) हे अर्जुना, माणसाच्या नित्य शत्रू असणाऱ्या या अतृप्त कामाद्वारे ज्ञानी मनुष्याचे आत्मज्ञान आच्छादिले जाते. (3.39) इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. काम --- इंद्रियांवर, मनावर आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवून --- आत्म-ज्ञानावर पडदा टाकून एखाद्या जीवात्म्याला मोहित करतो. (3.40) म्हणून, हे अर्जुना, प्रथम इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, आत्मज्ञान आणि आत्म-साक्षात्काराचा विनाश करणार्‍या भौतिक कामाचा वध कर. (3.41)

काम कसा नियंत्रित करावा

इंद्रिय शरीरापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते; मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे; बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे; आणि आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. (6.07-08 देखील पाहा) (3.42) अशा प्रकारे, हे अर्जुनात्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे हे जाणून आणि बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवून (जे आध्यात्मिक शक्तीद्वारे शुद्ध केलेली आहे), काम या पराक्रमी शत्रूचा विनाश करणे आवश्यक आहे. (3.43)

 

4. ज्ञानासह सर्वसंग परित्यागाचा मार्ग

कर्मयोग हा एक प्राचीन नियम आहे

परम भगवान म्हणाले: मी हा कर्मयोग, योग्य कृतीचे शाश्वत विज्ञान, राजा विवस्वानला दिले. विवास्वानने ते मनुला शिकवले. मनुने ते इक्ष्वाकूला शिकवले. अशा प्रकारे सदाचरणी राजांना हा (कर्मयोग) माहित होता. काळाच्या ओघामध्ये या पृथ्वीवरून कर्मयोगाचे विज्ञान हरवले. आज मी तुला त्याच प्राचीन विज्ञानाचे वर्णन केले आहे कारण तू माझा प्रामाणिक भक्त आणि सखा आहेस. कर्मयोग हे खरोखर एक दिव्य रहस्य आहे. (4.01-03) अर्जुन म्हणाला: विवास्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. म्हणून सृष्टीच्या प्रारंभी तुम्ही हा कर्मयोग त्याला शिकवला, हे मी कसे जाणावे? (4.04)

भगवंताच्या अवताराचा उद्देश

सर्वोच्च परमेश्वर म्हणाले: माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होवून गेले आहेत. मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. (4.05) जरी मी अविनाशी, अपरिवर्तनीय आणि सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तरीसुद्धा मी माझ्या दैवी शक्ती (योग माया) चा वापर करून स्वतःच्या भौतिक स्वरूपावर नियंत्रण ठेवून प्रगट होत असतो. (10.14 देखील पाहा.) (4.06) हे अर्जुना जेव्हा जेव्हा आणि जिथे धर्माचा (धर्माचरण) ऱ्हास होतो आणि अधर्माचे (अनाचरनाचे) वर्चस्व होते त्यावेळी मी स्वतः प्रगट होतो. चांगल्या गोष्टीचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचे परिवर्तन करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी वेळोवेळी प्रट होतो. (4.07-08) हे अर्जुना, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप (जन्म, देखभाल आणि विनाश) खरोखर जाणतो, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो आणि हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही. (4.09) आजपर्यंत आसक्ती, भय, क्रोध यांच्यापासून मुक्त होवून आणि माझा आश्रय घेऊन, माझे विचार पूर्णपणे आत्मसात करून आणि आत्म-ज्ञानाच्या अग्नीने अनेकाणेक मनुष्य पवित्र झाले आहेत. (4.10)

 

उपासना आणि प्रार्थनेचा मार्ग

लोक ज्या हेतूने माझी उपासना करतात, त्यानुसार मी त्यांच्या इच्छांची पूर्ती करतो. लोक वेगवेगळ्या हेतूंनी माझी उपासना करतात. (4.11) जे लोक पृथ्वीवर आपल्या कामात यशस्वी होण्याची आस धरतात ते देवतांची उपासना करतात. या मानवी जगात कामातील यश लवकर मिळते. (4.12) मानवी समाजाचे - कौशल्य आणि व्यवसाय- यावर आधारित चार विभाग माझ्याद्वारे तयार केले गेले आहते. जरी मी या श्रम विभागणीच्या व्यवस्थेचा कर्ता असलो तरी एखाद्याला हे माहित असले पाहिजे की मी अविनाशी असल्यामुळे मी अकर्ता आहे. (18.41 देखील पाहा) (4.13) कार्य किंवा कर्माने मी बद्ध होत नाही, कारण मला कर्माच्या फलांची इच्छा नाही. ज्याला या सत्याची पूर्ण जाणीव आहे तो सुद्धा कर्म फलांनी बद्ध होत नाही. (4.14) प्राचीन काळातील मुक्तिच्या साधकांनीही या दिव्य ज्ञानाने आपली कर्मे केली आहेत. म्हणून, तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. (4.15)

संलग्न, अलिप्त आणि निषिद्ध कर्म

कर्म म्हणजे काय आणि अकर्म काय आहे, याबद्दल बुद्धिमान लोकही संभ्रमित आहेत. म्हणूनच, कर्म म्हणजे काय हे मी स्पष्टपणे सांगतो, ते कळले की तू जन्म आणि मृत्यूच्या दुष्परिणामांपासून मुक्त होशील. (4.16) कर्माचे खरे स्वरुप समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच, मनुष्याला कर्माचे (किंवा स्वार्थी) स्वरूप, कर्माचे (किंवा निःस्वार्थी) स्वरूप आणि विकर्माचे स्वरूप देखील माहित असले पाहिजे. (4.17)

कर्मयोगी कर्माच्या नियमांच्या अधीन नाही

जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो एक बुद्धिमान मनुष्य आहे. असा प्रत्येक मनुष्य योगी आहे आणि त्याने सर्व काही मिळविले आहे. (3.05, 3.27, 5.08 आणि 13.29 देखील पाहा) (4.18) (कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि त्याउलट म्हणजे हे समजून घेणे आहे परमेश्वर आपल्या माध्यमाद्वारे सर्व कर्मे त्याच्या शक्तीद्वारे करतात. तो एक निष्क्रिय अभिनेता आहे. आपण सक्रियपणे निष्क्रिय आहेत कारण आपण त्याच्या सामर्थ्याच्या प्रवाहाशिवाय काहीही करू शकत नाही. म्हणूनच आपण कर्ता नाही, फक्त त्याच्या हातातील साधन आहोत.) अशी व्यक्ती, की ज्याच्या इच्छा आत्म ज्ञानरूप आगीमध्ये जळून भाजल्यामुळे निस्वार्थ झाल्या आहेत आहेत, त्याला बुद्धिमान व्यक्ती पंडित म्हणतात. (4.19) आपल्या कर्मफलांवरील सर्व आसक्तीचा त्याग करणारा आणि नित्य तृप्त असणारा आणि परमेश्वर सोडून इतर कोणावरही अवलंबून नसणारा, जरी सर्व प्रकारच्या --- कर्मामध्ये मग्न असला तरी --- वास्तविक तो काहीही करत नाही आणि चांगली किंवा वाईट अशी कोणतीही कार्मिक प्रतिक्रिया निर्माण करत नाही. (4.20) जो सर्व इच्छांपासून मुक्त झाला आहे, ज्याचे मन आणि इंद्रिय त्याच्या नियंत्रणात आहेत, आणि जो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींच्या स्वामित्त्वाच्या भावनेचा त्याग करतो, तो शारिरीक क्रिया करूनही -- कार्मिक प्रतिक्रियेच्या – पापकर्माने प्रभावित होत नाही. (4.21) त्याच्या/परमेश्वराच्या इच्छेनुसार नैसर्गिकरित्या जे काही मिळते त्या लाभाने जो संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे, मत्सर करीत नाही, यशापयशामध्ये स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारची कर्म करीत असला तरी असा कर्मयोगी कर्मामुळे कधीच बद्ध होत नाही. (4.22) जो आसक्तीपासून मुक्त आहे, ज्याचे मन पूर्णपणे आत्मज्ञानामध्ये स्थि आहे, जो भगवंताची सेवा (सेवा) म्हणून कर्म करतो, अशा परोपकारी व्यक्तीची (कर्मयोगी) सर्व कर्मबंधने मुक्त होतात. (4.23) जो सर्व काही भगवंताचे प्रकटीकरण किंवा ब्रह्मदेवाचे कृत्य मानतो त्याला शाश्वत ब्रह्मा प्राप्त होईल. (9.16 देखील पहा) (4.24)

 

वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यात्मिक पद्धती

काही योगी देवदेवतांना (देव, संरक्षक देवदूत) यज्ञाद्वारे अनुष्ठान करून त्यांची उपासना करतात, तर काही आत्म-ज्ञानासाठी शास्त्रांचा अभ्यास करतात. काही त्यांच्या इंद्रियांवर अंकुश ठेवतात आणि त्यांच्या कामसुखाचा त्याग करतात. इतर प्राणायाम व योगाभ्यास करतात. काहीजन दान देतात आणि आपल्या संपत्तीचा त्याग करतात. (4.25-28) जे लोक योगाभ्यासात गुंतलेले आहेत, ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. (4.29) अन्य लोक त्यांचा आहार नियमन करतात आणि प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. हे सर्व लोक त्यागाचे जाणकार आहेत आणि त्यांच्या बलिदानाद्वारे शुद्ध झालेले आहेत. (4.30) नि: स्वार्थ सेवा करणार्‍यांना त्यागाचा परिणाम म्हणून आत्म-ज्ञानाचा सुगंध प्राप्त होतो आणि परमात्म्याला प्राप्त होतात. हे अर्जुना, त्याग करणारे या जगातसुद्धा सुखाची प्राप्ती करू शकत नाही, तर परलोकाबद्दल काय सांगावे? (4.38 आणि 5.06 देखील पाहा). (4.31) वेदांमध्ये अनेक प्रकारच्या आध्यात्मिक शास्त्राचे वर्णन केले आहे. ते सर्व कर्मातून किंवा शरी, मन आणि इंद्रियांच्या कृतीतून जन्मलेले आहेत हे जाणून घे. हे जाणून घेतले तर तुझे तारण होईल (मोक्ष, निर्वाण). (3.14 देखील पाहा) (4.32)

 

अलौकिक ज्ञान मिळवणे ही एक श्रेष्ठ आध्यात्मिक पद्धत आहे

हे अर्जुना, कोणत्याही (द्रव्यमय यज्ञापेक्षा)/ (भौतिक लाभापेक्षा किंवा भेटवस्तूपेक्षा) आत्म-ज्ञान संपादन करणे आणि त्याचा प्रसार श्रेष्ठ आहे. कारण सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान शेवटी दिव्य ज्ञानामध्ये होते. (4.33) आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीकडून नम्र श्रद्धेने, प्रामाणिकपणाने प्रश्न विचारून आणि सेवेद्वारे हे दिव्य ज्ञान मिळव. ज्या ज्ञानी लोकांना सत्याची जाणीव झाली आहे ते तुला ज्ञान प्रदान करतील. (4.34) हे अर्जुना, हे सत्य समजल्यानंतर, तू पुन्हा अशा प्रकारे मोहित होणार नाही. या ज्ञानाने तू सर्व प्राणीमात्र हे माझ्यामध्येच (सर्वप्रथम) परमात्म्यामध्ये पाहशील, नंतर तुझ्या स्वत:च्याच उच्च स्वरूपामध्ये पाहशील (आणि मग प्रत्येक गोष्टीत मलाच पाहशील). (4.35) जरी कोणी सर्व पापी लोकांपैकी महापापी असेल, तरीही केवळ एकट्या आत्म-ज्ञानाच्या नौकेने पापाचे महासागर ओलांडू शकेल. (4.36) ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी लाकूड भस्मसात करून टाकतो त्याचप्रमाणे, हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो.(4.37)

 

कर्मयोगींवर अलौकिक ज्ञान स्वयंचलितपणे प्रकट होते

रे तर, या जगामध्ये परमात्म्याच्या खऱ्या ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे काहीही नाही. जो कर्मयोगाने शुद्ध होतो त्याला हे ज्ञान काळाच्या ओघात नैसर्गिकरित्या स्वत:मध्येच प्राप्त होते. (4.31 आणि 5.06, 18.78  देखील पाहा) (4.38) जो मनुष्य श्रद्धावान आणि योगशास्त्रामध्ये प्रामाणिक आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत, त्याला हे दिव्य ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान प्राप्त केल्यावर, त्याला परम शांती प्राप्त होते. (4.39.) अविवेकी, संशयी आणि श्रद्धाहीन मनुष्य (नास्तिक) नष्ट होतो. अशा संशयी आत्म्याला हे लोक ना परलोक किंवा सुखाचीही प्राप्ती होवू शकत नाही. (4.40)

 

निर्वाणासाठी अलौकिक ज्ञान आणि कर्मयोग या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत

कर्मफलांचा त्याग करून जो कर्म करतो आणि आत्म-ज्ञानाद्वारे ज्याचे स्वत:बद्दलचे संशय पूर्णपणे नष्ट झाले आहे, हे अर्जुना तो कार्य(कर्म) बंधानांनी बद्ध होत नाही (4.41) म्हणून, अज्ञानामुळे तुझ्या मनात (परमात्म्याबद्दल) जे संशय उत्पन्न झाले आहेत ते आत्म-ज्ञानाच्या तलवारीने छाटून टाक आणि कर्मयोगाचा आश्रय घे आणि हे अर्जुना, युद्धासाठी उभा राहा.(4.42)

 

5. संन्यासाचा मार्ग

अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, आपण अलौकिक ज्ञानाची आणि निस्वार्थ सेवेच्या कर्मयोगाची प्रशंसा केलीत. मला सांगा, या दोघांपैकी माझ्यासाठी कोणता अधिक कल्याणकारक आहे, ते कृपया मला सांगा. (5.05 देखील पाहा) (5.01) परम भगवान म्हणाले: आत्म-ज्ञानाचा मार्ग आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग दोघेही सर्वोच्च ध्येयाकडे नेतात. परंतु, या दोघांपैकी निःस्वार्थ सेवा ही आत्म-ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. (5.02) ज्याला आसक्ती नाही आणि अनासक्तीही नाही अशा व्यक्तीला खरा संन्यासी समजला पाहिजे. हे अर्जुना, सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे कर्म बंधनातून मुक्त होतो. (5.03)

 

दोन्ही पथ परमात्म्याकडे पोहोचतात

अज्ञानी लोक --- विद्वान नव्हे --- आत्म-ज्ञानाचा मार्ग (किंवा संन्यासाचा) आणि निस्वार्थ सेवेचा मार्ग (कर्मयोग) एकमेकांपेक्षा वेगळा आहे असे समजतात. जो कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रितीने अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. (5.04) संन्यासी जे काही ध्येय गाठतो, कर्मयोगीदेखील तेच ध्येय गाठतो. म्हणून, जो संन्यासाचा मार्ग आणि निःस्वार्थ कर्माचा मार्ग एक सारखाच पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. (6.01 आणि 6.02 देखील पाहा) (5.05) परंतु, हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय खरा संन्यास प्राप्त करणे अवघड आहे. कर्मयोज्ञाला विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती होते. (4.31 आणि 4.38 देखील पाहा) (5.06) एक कर्मयोगी ज्याचे मन शुद्ध आहे, ज्याचे मन आणि इंद्रिय नियंत्रित आहेत आणि जो सर्व जीवात्म्यामध्ये परमात्म्याला पाहतो, तो कर्म करत असूनही कर्म बंधनात बद्ध होत नाही. (5.07)

एक कर्मयोगी भगवंतासाठी कार्य करतो

सत्य जाणणारा विद्वान मनुष्य(किंवा संन्यासी) विचार करतो की: "मी काहीही करत नाही". पाहत असतांना, ऐकत असतांना, स्पर्श करीत असतांना, वास घेत असतांना, खात असतांना, चालत असतांना, झोपत असतांना, श्वास घेतांना; आणि बोलतांना, दान करतांना, स्वीकार करतांना तसेच डोळ्यांची उघडझाप करतांना एक संन्यासी नेहमी जाणतो की केवळ इंद्रिये आपापल्या विषयांवर कार्य करत आहेत. (3.27.13.29 आणि 14.19 देखील पाहा.) (5.08-09) जो सर्व कर्मे भगवंताला समर्पित करून --- स्वार्थी आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्याने ओले होत नाही त्याप्रमाणे कार्मिक प्रतिक्रियेपासून प्रभावित होत नाही. (5.10) कर्मयोगी --- स्वार्थी आसक्तीचा त्याग करून --- शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारे केवळ आत्म शुध्दीकरणासाठी कर्म करतात. (5.11) कर्मयोगी कर्माफलांचा त्याग करून परम आनंद प्राप्त करतो; तर इतर, जे कर्म फलांशी आसक्त आहेत ते स्वार्थाच्या कर्मांनी बद्ध होतात. (5.12)

आत्म-ज्ञानाचा मार्ग

एखादी व्यक्ती ज्याने सर्व कर्मांच्या फलाचा पूर्णपणे त्याग केला आहे, तो कर्म न करता आणि कर्म न करविता आनंदाने जगतो. (5.13) परमेश्वर कृती करण्याची उत्कट इच्छा निर्माण करीत नाही, कर्तृत्वाची भावना किंवा लोकांमध्ये कर्मफलाबद्दल आसक्ती निर्माण करत नाही. हे सर्व प्रकृतीच्या शक्तींद्वारे केले जाते. (5.14) एखाद्याच्या पुण्य किंवा पाप कर्माची जबाबदारी परमेश्वर स्वत:कडे घेत नाही. आत्मज्ञान हे अज्ञानाने आच्छादित केले जाते; त्याद्वारे लोक मोहित होतात (आणि पाप कर्मे करतात). (5.15) अलौकिक ज्ञान आत्म्याच्या अज्ञानाचा नाश करते आणि ज्याप्रमाणे सूर्य जगातील सर्व वस्तूंचे सौंदर्य प्रकाशित करतो त्याप्रमाणे हे ज्ञान परमात्म्याला प्रकाशित करते. (5.16) ज्या मनुष्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे ब्रह्मा (चिरंतन अस्तित्व) मध्ये एकरूप होते, जे ब्रह्माचे असीम भक्त आहेत, ज्यांचे सर्वोच्च लक्ष्य आणि एकमात्र आश्रयस्थान ब्रह्मा आहे आणि ज्यांची कल्मषे ब्रह्माच्या ज्ञानाने धुतली गेली आहेत आहे, त्यांना मुक्ती मिळते, ते पुन्हा जन्म घेत नाहीत. (5.17)

प्रबुद्ध व्यक्तीची अतिरिक्त लक्षणे

एक ज्ञानी व्यक्ती (सर्वांना परमेश्वर मानून) एक विद्वान आणि नम्र पुजारी/ब्राह्मण, एक बहिष्कृत/चांडाळ, अगदी गाय, हत्ती किंवा कुत्रा यांच्याकडे समान दृष्टीने पाहते. (6.29 देखील पाहा) (5.18) ज्याचे मन एकत्त्व आणि समतेत स्थित झाले आहे अशा मनुष्याने या आयुष्यात सर्व काही साध्य केले आहे. अशा व्यक्तीने चिरंतन ब्रह्म जाणले आहे कारण चिरंतन ब्रह्म हे निर्दोष आणि निःपक्षपाती आहे. (18.55 देखील पाहा) (5.19) जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यांनतर हर्षोल्हासित होत नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यानंतर शोक करत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणी भगवतविज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित आहे. (5.20) असा मनुष्य जो ब्रह्माच्या ठायी एकरूप झालेला आहे, तो चिंतनातून स्वत:मध्येच सुखाचा अनुभव घेत बाह्य भौतिक इंद्रिय सुखांकडे आसक्त होत नाही आणि त्याला अमर्याद सुखाचा अनुभव येतो. (5.21) भौतिक सुख हे खरे तर दु: खाचे उगमस्थान आहे आणि अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो. म्हणून हे अर्जुना, अशा ऐहिक सुखात आनंद घेऊ नकोस. (18.38 देखील पाहा) (5.22) वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि क्रोधाचा प्रतिकार करण्यास समर्थ झाला तर तो योगी आणि आनंदी व्यक्ती आहे. (5.23) जो पुरूष अंतरात्म्यातील परमात्म्यासह सुखी आहे, ब्रह्मातच रमणारा आणि ज्ञान मिळालेला आहे, असा योगी ब्रह्मनिर्वाण प्राप्त करतो आणि परमात्माला प्राप्त होतो. (5.24) ज्यांची पापे (किंवा अपूर्णता) नष्ट झाली आहे, आत्मज्ञानातून ज्यांच्या शंका दूर झाल्या आहे, ज्यांची मने शिस्तबद्ध (स्थिर) आहेत आणि जे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी गुंतलेले आहेत, ते परमात्म्याला प्राप्त करतात. (5.25) जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहे, ज्यांनी आपले मन व इंद्रिये वश केलेले आहेत आणि ज्यांना आत्म-ज्ञान झाले आहे त्यांना सहजपणे ब्रह्मनिर्वाण मिळते. (5.26)

तिसरा मार्ग --- भक्तीपूर्ण ध्यान आणि चिंतनाचा मार्ग

सर्व इंद्रिय भोगांचा त्याग करून, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी मन स्थिर करून, नाकपुड्यांमध्ये जाणारा श्वासोच्छ्वास समतुल्य करून आणि इंद्रिय, मन आणि बुद्धी संयमित करून, मोक्ष (मुक्ति) हे प्रमुख ध्येय असणारा आणि इच्छा, क्रोध आणि भीतीपासून मुक्त असणारी व्यक्ती म्हणजे खरे तर मुनी होय. (5.27-28) मी (किंवा कृष्ण, परमात्मा) सर्व विश्वाचा परमेश्वर आणि सर्व सृष्टींचा मित्र आहे, त्याग आणि तपस्यांचा परम भोक्ता आहे. हे जाणून माझा भक्त सांसारिक दु:खापासून शांती प्राप्त करतो. (5.29)

6. ध्यानाचा मार्ग

कर्मयोगी देखील एक संन्यासी आहे

परम भगवान म्हणाले: जो आपल्या कर्मफलांवर (वैयक्तिक उपभोगासाठी) आसक्त नसून विहित कर्म करतो तो संन्यासी आणि कर्मयोगी असतो. केवळ अग्निचा त्याग केल्यामुळे कोणी संन्यासी होत नाही आणि केवळ कर्मापासून दूर राहून कोणी योगी बनत नाही. (6.01) हे अर्जुना, ज्याला ते संन्यास म्हणतात त्यालाच कर्मयोग असेही म्हणतात. जोपर्यंत मनुष्य कर्मामागील स्वार्थी हेतूचा त्याग करत नाही तोपर्यंत कोणीही कर्मयोगी बनत नाही. (5.01, 5.05, 6.01 आणि 18.02 देखील पाहा) (6.02)

योग आणि योगी ची व्याख्या

योग (ध्यान, किंवा मनाची शांतता) प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार्‍या विद्वानांसाठी कर्मयोग हे एक साधन आहे असे म्हणतात. ज्यांनी योग साध्य केला आहे, त्याच्यासाठी शांतता हे आत्म-साक्षात्काराचे साधन बनते. असे म्हणतात की जेव्हा मनुष्य इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा किंवा कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करेल तसेच सर्व स्वार्थी हेतूंचा त्याग करेल तेव्हाच तो योगारूढ होईल. (6.03-04)

मन एक मित्र आणि शत्रू दोन्हीही आहे

एखाद्याने स्वतःच्या मनाद्वारे स्वत:ची अधोगती होवू न देता स्वत:चा उद्धार केला पाहिजे. मन हे एका बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही असते. ज्याने मनाला जिंकले आहे, त्याचासाठी मन हे मित्र आहे आणि जो मनावर नियंत्रण ठेवत नाही त्यांच्यासाठी मन हे परम शत्रू असते. (6.05-06) ज्याने - मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळविले आहे आणि जो - शीत आणि उष्ण, सुख आणि दु:ख, मान आणि अपमान यांच्यामध्ये शांत आहे, तोच परमात्माबरोबर कायम स्थि आहे. (6.07) ज्यांच्याकडे आत्मज्ञान आणि आत्मजान आहे, जो शांत आहे, ज्याचे मन व इंद्रियांवर नियंत्रण आहे आणि ज्याच्यासाठी गारेचे खडे, दगड आणि सोने समान आहे त्याच व्यक्तीला योगी म्हटले जावू शकते (6.08) मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक, मित्र, शत्रू, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, नातेवाईक, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक विशेष मानला जातो. (6.09)

ध्यानाची तंत्रे

एकाकी आणि एकट्याने बसलेल्या योगी व्यक्तीने मन आणि इंद्रियांना नियंत्रणात आणून, आकांक्षास्वामित्त्वाच्या भावनेपासून मुक्त होवून परमात्माचे सतत ध्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (6.10) (योगाभ्यासासाठी) मनुष्याने एखाद्या स्वच्छ जागी भूमीवर कुशासन अंथरावे, की जे उंचावरही असू नये आणि अत्यंत खालीही असू नये, ते मृगचर्म आणि मृदू वस्राने आच्छादित करावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर आरामदायक/स्थिर स्थितीत बसून, भगवंतावर मन केंद्रित करून, विचारांवर नियंत्रण ठेवून आणि इंद्रियक्रिया यांचे संयमन करून आत्म-शुद्धीकरणासाठी ध्यानधारणा करावी. (6.11-12) मनुष्याने आपली कंबर, पाठीचा कणा, छाती, मान आणि डोके सरळ उभ्या रेषेत ताठ, हालचाल न करता आणि स्थिर धरावे; आजूबाजूला न पाहता, नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे; तुमचे मन निर्मळ आणि निर्भय बनवावे. ब्रह्मचर्य पालन करून; मनावर नियंत्रण ठेवावे; माझा विचार करावा आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे. (4.29,5.27, 8.10 आणि 8.12 हे देखील पाहा) (6.13-14) अशा प्रकारे, मन माझ्यावर स्थिर ठेवण्याचा निरंतर अभ्यास करून, मन संयमित झालेला योगी, ब्रह्मनिर्वाणाची शांती प्राप्त करतो आणि माझ्याकडे येतो. (6.15)

हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही अशांना हा योग साध्य होत नाही. (6.16) जो मनुष्य आपल्या आहार, करमणूक, कर्म, निद्रा आणि विहार यांच्या बाबतीत नियमीत असतो, तो ध्यान करण्याच्या योगाद्वारे सर्व दु: खाचा नाश करतो. (6.17) योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमीत करतो आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त होवून ब्रह्मामध्ये एकरूप होवून समाधीमध्ये स्थित होतो, तेव्हा तो योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते आणि मग तो परमात्म्याला प्राप्त होतो.  (6.18) जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी दीप ज्याप्रमाणे न फडफडता संथपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी परमात्म्याचे ध्यान करतो. (6.19)

योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते, तेव्हा शुद्ध बुद्धीने तो परमात्म्याशी तादात्म्य पावतो. (6.20) इंद्रियातील असीम आनंद होतो, जो केवळ बुद्धीद्वारे जाणता येतो आणि जो इंद्रियांच्या आवाक्याबाहेर असतो. चिरंतन अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर, व्यक्ती कधीही परिपूर्ण परम सत्यापासून विचलीत होत नाही. (6.21) मनुष्याला आत्म-ज्ञान झाल्यांनतर (एसआर), तो इतर कोणताही लाभ आत्म-ज्ञानापेक्षा वरचढ मानत नाही. आत्म-ज्ञानामध्ये स्थित झाल्यांनतर, महान आपत्ती देखील मनुष्याला विचलीत करू शकत नाही. (6.22) दु:खापासून विघटीत होण्याच्या या अवस्थेस योग म्हणतात. हा योग दृढनिश्चयपूर्वक आणि न कंटाळता, धैर्य व उत्साह्युक्त मनाने केला पाहिजे. (6.23) सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून, बुद्धीद्वारे इंद्रियांना इंद्रियविषयांपासून रोखून, प्रशिक्षित आणि पवित्र बुद्धीद्वारे मनाला पूर्णपणे चिरंतन आत्म्यामध्ये लीन ठेवून आणि माझाच विचार करून मनुष्य हळूहळू मनाची शांतता प्राप्त करतो. (6.24-25) हे चंचल आणि अस्थिर मन ध्यानाच्या वेळी जेथे जेथे भरकटते त्यावर मनुष्याने सावधपणे लक्ष ठेवले पाहिजे. (6.26)

योगी कोण आहे?

आत्म-जान असलेल्या योगी मनुष्याला, ज्याचे मन शांत आहे, ज्याच्या इच्छा संयमित आहेत आणि जो पापांपासून मुक्त आहे (किंवा दोष) त्याला दिव्य सुखाची अनुभूती होते. (6.27) असा पापमुक्त योगी, जो निरंतर आपल्या मन व बुद्धीने परमात्म्याचे चिंतन करतो, तो सहजपणे ब्रह्माच्या संपर्कातील असीम आनंद प्राप्त करतो. (6.28) जो योगी परब्रह्मामध्ये एकरूप झाला आहे तो सर्व प्राणीमात्रांमध्ये परब्रह्माला पाहतो आणि सर्व जीवात्म्यांना परब्रह्मामध्ये पाहतो; आणि प्रत्येक व्यक्तीला समान भावाने पाहतो. (4.35, 5.18 देखील पाहा) (6.29) जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधीही दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. (6.30) The non-dualists, who adore Me as abiding in all beings, abide in Me irrespective of their mode of living. (6.31) मी सर्व प्राणीमात्रांमध्ये राहतो असे मानणारे द्वैतवादी लोक, त्यांची जगण्याची कोणतीही पद्धत असली तरीही माझ्यामध्येच निवास करतात. (6.31)  जो पुरूष परमात्म्याला एकरूप होवून सर्व प्राणीमात्रात असलेल्या परमात्म्याला भजतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असाला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच म्हणजे परत्म्यातच होत असतात. जो सर्व जीवांकडे वास्तविक समभावनेने पाहतो आणि इतरांच्या सुख-दु:खाना स्वतः अनुभवू शकतो, हे अर्जुना तो एक सर्वश्रेष्ठ योगी मानला जातो. (6.32)

मनाला नियंत्रित करण्याच्या दोन पद्धती

अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, तुम्ही सांगितले की मनाची शांतता हे ध्यानयोगाचे वैशिष्ट्य आहे, परंतु मनाच्या चंचलतेमुळे मला मनाची स्थिर स्थिती आणता येत नाही. हे कृष्णा, मन हे चंचल, अनावर, बलवान आणि दुराग्रही आहे. माझ्या मते मनावर संयम ठेवणे हे वायूला नियंत्रित करण्या तकेच कठीण आहे. (6.33-34) परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, मन चंचल आहे आणि त्यास संयमित करणे नि: संशय अत्यंत कठीण आहे, परंतु हे अर्जुना, हे चिकाटीने निरंतर अध्यात्मिक अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. (6. 35) माझ्या मते, ज्याचे मन वश झालेले नाही त्याच्यासाठी योग कठीण आहे. तथापि, ज्याने मन योग्य मार्गाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून संयमित केले आहे तो योग प्राप्ती करू शकतो. (6.36)

अयशस्वी योग्याचे गंतव्य

अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, जो आरंभी ध्यानमार्गाचा श्रध्देने स्वीकार करतो आणि आसक्त मनामुळे योग-सिद्धी प्राप्त करण्यास अपयशी ठरतो -- अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? (6.37) ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट असा हा मनुष्य ज्याने (योग आणि भोग, स्वर्गीय आणि सांसारिक सुख) दोन्हीही गमावले आहेत, हे कृष्णा, तो निराश आणि छिन्नविछिन्न ढगाप्रमाणे पतित होवून भ्रष्ट होवून नाश तर पावत नाही ना? (6.38) हे कृष्णा, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्याशिवाय हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. (15.15 देखील पाहा) (6.39) परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, योगी मनुष्याचा इहलोकात किंवा परलोकातही विनाश हो नाही. माझ्या प्रिय मित्रा, एक आत्मेद्धारासाठी प्रयत्न करणारा मनुष्य कधीही अधोगतीला जात नाही/ दु: खी होत नसतो. (6.40)

योगभ्रष्ट योगी अनेकानेक वर्षे स्वर्गात राहिल्यानंतर धार्मिक आणि वैभवशाली कुटुंबामध्ये पुन्हा जन्म घेतो, किंवा असा योगी, बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखरच अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. (6.41-42) हे अर्जुना, असा जन्म मिळाल्यानंतर तो योगी आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य ज्ञानाचे पुनरूज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी मिळविण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. (6.43) पूर्वजन्मातील योगाभ्यासाच्या संस्कारांच्या आधारावर तो योगी परमात्म्याकडे आकृष्ट होतो. अगदी योगाची केवळ विचारपूस करणारा देखील --- ईश्वराशी असलेल्या एकरूपतेमुळे --- वैदिक विधी करणार्‍यांना मागे टाकतो. (6. 44) जो योगी परिश्रमपूर्वक, अनेक जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर हळूहळू परिपूर्ण झाल्यावर सर्व पापांपासून (किंवा अपूर्णते) पूर्णपणे मुक्त होतो आणि परमगतीला प्राप्त होतो. (6.45)

उत्तम योगी कोण आहे?

योगी मनुष्य हा तपस्वींपेक्षा श्रेष्ठ आहेत. योगी (वैदिक) विद्वानांपेक्षा श्रेष्ठ आहेत. योगी अनुष्ठान करणार्‍यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून हे अर्जुना, योगी हो. (6.46) सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझे चिंतन करतो आणि ज्यांचे मन सदैव माझ्यामध्ये मग्न आहे --- असा योगी सर्वोत्कृष्ट असल्याचे मला वाटते. (12.02 आणि 18.66 देखील पाहा) (6.47)

 

7. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान

परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, माझ्यामध्ये तुझे मन पूर्णपणे आसक्त करून, माझा आश्रय घेवून आणि योगाभ्यासाद्वारे तू मला नि:संदेह पूर्णपणे कसा जाणू शकशील ते ऐक. (7.01) या जगात आणखी काहीही ज्ञात करण्याजोगे नाही हे समजून घेतल्यानंतर, मी तुला प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान देईल. (7.02) हजारो व्यक्तींपैकी एखादाच आत्म-ज्ञानाच्या परिपूर्णतेसाठी प्रयत्न करतो. आत्मज्ञान प्राप्त करणाऱ्यांपैकी एखादाच मला तत्वत: जाणतो. (7.03)

पदार्थ, चैतन्य आणि आत्मा यांची परिभाषा

मन, बुद्धी, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही माझ्या भौतिक उर्जेची (प्रकृती) ची आठ रूपे (किंवा प्रकार) आहेत. (13.05 देखील पाहा) (7.04) हे अर्जुना, माझी कनिष्ट प्रकृती ही भौतिक ऊर्जा आहे. माझी दुसरी श्रेष्ठ प्रकृती म्हणजे आत्मा (पुरुष) आहे, ज्यामध्ये संपूर्ण विश्वाचा समावेश आहे. (7.05) हे जाणून घे की सर्व प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो; आणि मी --- परमात्मा (परब्रह्म, कृष्ण) --- उत्पत्तीकर्ता आहे, तसेच प्रलयकर्ताही आहे. (13.26 देखील पहा) (7.06)

परमात्मा हा प्रत्येक गोष्टीचे मूळ असतो

हे अर्जुना, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे काहीही नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे ब्रह्मांडातील सर्व गोष्टी माझ्यामध्ये आश्रित आहेत. (7.07) हे अर्जुना, पाण्यामधील रस मी आहे, सूर्य आणि चंद्रामधील तेज मी आहे, सर्व वेदांमधील पवित्र ‘ओम’ मी आहे, आकाशातील ध्वनी आणि मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. मी पृथ्वीचा मधुर सुगंध आहे. मी अग्नीमधील तेज आहे, सर्व जीवांमधील जीवनशक्ती आहे आणि सर्व तपस्यांचे तप मी आहे. (7.08-09) हे अर्जुना, अस्तित्वातील सर्व प्राणिमात्रांचे शाश्वत बीज म्हणून मला समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्वींचे तेज आहे. (9.18 आणि 10.39 देखील पाहा) शक्तीवानांची शक्ती मी आहे, जी काम तसेच आसक्तीरहित असते. हे अर्जुना, धार्मिकतेनुसार (धर्म) (विवाहानंतर प्रजोत्पादनाच्या पवित्र आणि एकमेव उद्देशाने) मनुष्यामध्ये असणारा काम (कामदेव) देखील मीच आहे. (7.10-11) हे जाणून घे की भौतिक स्वरुपाचे तीन प्रकार (गुण) --- चांगुलपणा, आवड आणि अज्ञान / सात्विक, राजसिक आणि तामसिक --- हे देखील माझ्यापासून उत्पन्न होतात. मी गुणांवर अवलंबून नाही किंवा मी प्रभावितही नाही, पण गुण माझ्या अधीन आहेत. (9.04 आणि 9.05 देखील पाहा) (7.12) भौतिक निसर्गाच्या या तीन गुणांनी मनुष्य मोहित होतो; म्हणूनच, ते त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप ते जाणत नाहीत. (7.13)

कोण देव शोधतो?

तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी शक्ती (माया), हिच्यावर मात करणे फार कठीण आहे. केवळ जे लोक मला शरण येतात तेच या मायेला सहजपणे पार करतात. (14.26, 15.19, आणि 18.66 देखील पाहा) (7.14) दुष्कर्म करणारे, अज्ञानी, आसुरी वृत्तीशी संबंधित सर्वात नीच मनुष्य (नराधम) आणि ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे ते माझी उपासना करत नाहीत किंवा माझा शोध घेत नाहीत. (7.15)

हे अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करतात किंवा माझी उपासना करतात. ते आहेत: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्यांनी परम ज्ञानाचा अनुभव घेतला आहे असे ज्ञानी. (7.16) त्यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे, जो माझ्याशी सदैव एकरूप राहतो आणि जो एकात्म भावाने भक्ती करतो, तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. (7.17) नि:संशय हे सर्व भक्त खरोखर थोर आहेत, परंतु माझ्या ज्ञानी भक्ताला मी माझेच स्वरूप आहे असे मानतो. जो स्थिर राहतो तो माझ्यात विलीन होतो आणि माझ्या परम धामात निवास करतो. (9.29 हे देखील पाहा.) (7.18) अनेकानेक जन्मानंतर सर्वकाही माझे (किंवा परमात्म्याचे) आहे असा साक्षात्कार झालेला ज्ञानी माझा आश्रय घेतो. असा महान आत्मा अत्यंत दुर्मिळ आहे. (7.19) ज्यांची विवेकबुद्धी भौतिक कामनांनी हिरावलेली आहे, ते देवदेवतांना शरण जातात, आपापल्या कार्मिक स्वभावाद्वारे प्रवृत्त होवून आराधनेच्या विविध विधीविधानांचे पालन करतात. (7.20)

देव कोणत्याही प्रकारच्या उपासनेम्ध्ये प्रतिमेच्या स्वरूपात दिसू शकतो

जेव्हा मनुष्य श्रद्धेने विशिष्ठ देवतेची (कोणतेही नाव, स्वरूप आणि पद्धत वापरुन) उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा विशिष्ठ देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढ करतो. स्थिर श्रद्धेमुळे, तो त्या देवतेची उपासना करतो आणि त्या देवतेद्वारे आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुत: ते लाभ मीच प्रदान करतो. (7.21-22) अशा अल्पबुद्धी लोकांचा हा भौतिक फायदा तात्पुरता असतो. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परधामाची प्राप्ती करतात आणि अंती मलाच येवून मिळतात. (7.23)

अल्पबुद्धी लोक की जे --- माझे अपरिवर्तनीय, अतुलनीय, अनाकलनीय, आणि अलौकिक स्वरुप (किंवा अस्तित्व) समजण्यास असमर्थ आहेत, असे मानतात की--- मी, परमात्मा निराकार आहे आणि मनुष्याप्रमाणे प्रकट होवून जन्म झालेला आहे. (रूपे धारण करतो). (7.24) मी स्वतःला त्या अज्ञानी लोकांसमोर कधीही प्रकट करीत नाही, माझ्या दैवी शक्तीद्वारे (माया) मी त्यांना अप्रकट राहतो, ते माझे अजन्मा, चिरंतन आणि अलौकिक स्वरूप आणि व्यक्तिमत्त्व जाणत नाहीत. (7.25)

हे अर्जुना, भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील सर्व जीव मी जाणतो, परंतु कोणीही मला जाणत नाही. (7.26) हे अर्जुना, इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे, या जगातील सर्व प्राणी पूर्णपणे अज्ञानात आहेत. परंतु निःस्वार्थ कर्मे करणारे लोक, ज्यांचे कर्म किंवा पाप संपुष्टात आले आहे, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझी उपासना करतात. (7.27-28) ज्यांना जन्म, वृद्धावस्था आणि मृत्यूच्या चक्रांपासून मुक्त व्हायचे आहे ते माझा आश्रय घेतात. त्यांना ब्रह्माचे (शाश्वत जीवनाचे), ब्रह्माचा स्वभाव आणि कर्म, ब्रह्म शक्तीचे पूर्ण आकलन असते. (7.29) जे दृढ लोक, मला नश्वर जीव, लौकिक दैवी जीव आणि अगदी मृत्यूच्या समयीही परमात्मा म्हणून जाणतात, अशा स्थिर व्यक्ती मला येवून मिळतात. (8.04 देखील पहा) (7.30)

8. चिरंतन आत्मा

अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, चिरंतन आत्मा कोण आहे? चिरंतन आत्म्याचे स्वरूप काय आहे? कर्म म्हणजे काय? नश्वर जीव कोण आहेत? आणि देवता कोण आहेत? परमात्मा कोण आहे आणि तो शरीरात कसा राहतो? हे कृष्णा, ज्यांचा मनावर ताबा आहे ते मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात? (8.01-02)

परमात्मा, आत्मा, स्वतंत्र आत्मा आणि कर्म यांची व्याख्या

परम भगवान म्हणाले: अपरिवर्तनीय आत्म्याला ब्रह्म (चिरंतन आत्मा) म्हणतात. ब्रह्माच्या नित्य स्वभावाला (आकलन आणि इच्छांच्या अंतर्भूत शक्तीसह) अध्यात्म असे म्हणतात. ब्रह्माची सृजनशील शक्ती की ज्यामुळे सजीव अस्तित्वाचे प्रकटीकरण होते, त्याला कर्म म्हणतात. (8.03) मर्त्य जीवांना अधिभूत असे म्हणतात. दैवी व्यक्तिमत्त्वाचा विस्तार --- जसे की नारायण, महा-विष्णू, ईश्वर इ. --- यांना दैवी आत्मा म्हणतात. हे अर्जुना, प्रत्येक देहधारी जीवामध्ये परम नियंत्रक म्हणून वास करणारा परमात्मा मी आहे. (8.04)

पुनर्जन्म आणि कर्माचा सिद्धांत

जे केवळ माझे स्मरण करतात, अगदी मृत्यूच्या वेळी देहत्याग करतांनाही, जो माझे स्मरण करतो, तो मला प्राप्त करतो; याबद्दल काही शंका नाही. (8.05) हे अर्जुना, आपल्या देहाचा त्याग करीत असतांना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो नि:संदेह प्राप्ती करतो (आयुष्याच्या शेवटी ज्या जीवाचे स्मरण करतो तो त्याला जीव प्राप्त होतो). (8.06)

ईश्वर-प्राप्तीची एक सोपी पद्धत

म्हणूनच, माझे सदैव स्मरण कर आणि तुझे कर्म कर. जर तुझे मन आणि बुद्धी नेहमी माझ्यावर केंद्रित असेल तर तू मला नक्कीच प्राप्त करशील. (8.07) आपले मन विचलीत होवू न देता, ते निरंतर ध्यानात मग्न करून, हे अर्जुना व्यक्ती परमात्म्याला प्राप्त करते. (8.08) मनुष्य परमात्म्याचे ध्यान करतो --- जो परमात्मा सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणूपेक्षाही सूक्ष्म (आणि सर्वात मोठ्यापेक्षा मोठा), सर्व गोष्टींचे पालनकर्ता, सर्व कल्पनांच्या अतीत असणारे, सूर्यासारखे स्वयं तेजस्वी, आणि दिव्य किंवा भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे --- दृढ मनाने आणि भक्तीने मृत्यूच्या वेळी; योगाच्या सामर्थ्याने दोन भुवयांमध्ये (सहावे चक्र) प्राणवायूला स्थिर करतो (जैविक चेतना, प्राण) तो व्यक्ती कृष्ण, परम दैवी व्यक्तीला प्राप्त करतो. (4.29, 5.27, 6.13 हे देखील पाहा) (8.09-10) वेदाचे जाणकार ज्याला अविनाशी म्हणतात; अशा परम धामाची प्राप्ती करण्याच्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला देईन; या परमधामामध्ये जेथे आसक्तीपासून मुक्त झालेले तपस्वी प्रवेश करतात; आणि ज्याची इच्छा करत, लोक ब्रह्मचर्य पालन करतात. (8.11)

मृत्यूच्या वेळी देवाचे ध्यान करून मोक्ष मिळव

जेव्हा एखादी व्यक्ती सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, सेरेब्रममध्ये / मस्तकामध्ये देवावर आणि प्राणावर (जीवन) वर लक्ष केंद्रित करून, योगाभ्यासात गुंतलेली असते, माझे ध्यान करते आणि --- परमात्म्याची पवित्र एकाक्षरी ध्वनी शक्ती –असणाऱ्या ओमकारचा जप करते तेव्हा तिला परमधाम प्राप्त होतो. (8.12-13) हे अर्जुना, जो अनन्य भावाने विचलीत न होता सतत माझा विचार करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ आहे. (8.14) माझी प्राप्ती केल्यानंतर, तो महान आत्मा या दयनीय क्षणभंगुर जगात पुन्हा जन्म घेत नाही कारण त्यांना परम सिद्धी प्राप्त झालेली असते. (8.15) सर्व जगातील अत्युच्य ब्रह्म लोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत ---सर्व लोकांमध्ये वारंवार जन्म आणि मृत्यू होतात. पण, हे अर्जुना, मला प्राप्त केल्यानंतर मनुष्य पुन्हा कधीच जन्म घेत नाही. (9.25 देखील पाहा) (8.16)

निर्मितीतील प्रत्येक गोष्ट चक्रीय आहे

ज्यांना हे माहित आहे की निर्मात्याचा (ब्रह्मा) एक दिवस एक हजार युगे (किंवा 4.32 अब्ज वर्षे) इतका आहे आणि त्याची रात्री देखील एक हजार युगे इतकी आहे, ते (योगी) दिवस आणि रात्र जाणणारे आहेत. (8.17) ब्रह्म देवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यानंतर सर्व जीव अव्यक्त स्वभावातून (आदि-प्रकृती) व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तामध्ये विलीन होतात. (8.18) सृष्टीकर्त्याचा (ब्रम्ह) दिवसाच्या आरंभी सर्व जीव पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात; आणि त्यांचा रात्रीच्या वेळी अपरिहार्यपणे, त्यांचा नाश होतो. (8.19)

याहून अन्य एक चिरंतन अव्यक्त प्रकृती आहे – परिवर्तनीय भौतिक जगाच्या (प्रकृति) पेक्षा उच्च आहे --- जेव्हा सर्व सृष्टी नष्ट होते तेव्हा ती नष्ट होत नाही. तिला परमात्मा (किंवा ब्रह्मा) म्हणतात. हे सर्वोच्च धाम असल्याचे देखील म्हटले जाते. जे माझे परमधाम प्राप्त करतात ते पुन्हा जन्म घे नाहीत. (8.20-21) हे अर्जुना, माझ्यावर अतूट-भक्ती करून हे परमधाम प्राप्त करणे शक्य आहे, ज्यामध्ये सर्व प्राणी अस्तित्त्वात आहेत आणि ज्याद्वारे हे सर्व विश्व व्यापलेले आहे. (9.04 आणि 11.55 देखील पाहा) (8.22)

निर्वानाचे दोन मूलभूत मार्ग

हे अर्जुना, आता ज्या वेगवेगळ्या मार्गाने, योग्याने या जगातून प्रयाण केले असता, तो परतून येतो अथवा येत नाही याचे वर्णन मी तुला करतो (8.23) जे योगी स्वत:ला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, शुक्लपक्षामध्ये आणि सूर्य जेव्हा उत्तरायनात असतो, त्या सहा महिन्यांमध्ये मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात (आणि पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत नाहीत). (8.24) धू, रात्र, कृष्णपक्ष आणि सूर्याच्या दक्षिणायणामध्ये जो योगी मरण पावतो तो स्वर्गलोकाची प्राप्ती करतो आणि पुन्हा पृथ्वीवर परत येतो. (8.25) प्रकाशमय मार्ग (अध्यात्मिक अभ्यास आणि आत्म-ज्ञानाचा मार्ग) आणि अंध:कारमय मार्ग (भौतिकवाद आणि अज्ञानाचा) असे या जगातून प्रयाण करण्याचे दोन शाश्वत मार्ग मानले जातात. आधीचा मुक्तीकडे जातो (मुक्ति, निर्वाण) आणि नंतरचा पुनर्जन्माकडे जातो. (8.26)

अलौकिक ज्ञान मुक्तीकडे नेते

हे अर्जुना, हे दोन्ही मार्ग जाणत असले तरीही योगी कधीही मोहित होत नाही. म्हणून, हे अर्जुना, माझ्याबरोबर नेहमी योगामध्ये स्थिर राहा. (8.27) ज्या योगींना हे सर्व माहित आहे, ते वेदाध्ययन, त्याग, तपस्या, दान केल्याने मिळणाऱ्या फलाच्या पलीकडे जातात आणि माझ्या सर्वोच्च शाश्वत धामाची प्राप्ती करतात. (8.28)

9.  परमगोपनीय ज्ञान

परात्पर प्रभूने म्हटले: तू कधीच माझ्यावर संशय घेत नसल्यामुळे, मी तुला अतिशय प्रगल्भ, परमगोपनीय, अलौकिक ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. हे जाणून घेतल्याने, तू ऐहिक अस्तित्वाच्या सर्व दु:खामधून मुक्त होशील. (9.01)

परात्पर स्वरूपाचे ज्ञान हे परम रहस्य आहे

सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे, हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे, ते अंतःप्रेरणेद्वारे समजू शकते, धर्माची परिपूर्णता आहे, आचरणात आणणे अत्यंत सोपे आहे आणि ते अविनाशी आहे. (9.02) हे अर्जुना, ज्यांचा या ज्ञानावर विश्वास नाही, ते मला प्राप्त करीत नाहीत आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्राकार मार्गावर त्यांचे पुनरागमन होत राहते. (9.03) हे संपूर्ण विश्व माझाच विस्तार आहे (मीच माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे विश्व व्यापले आहे). सर्व जीव माझ्यावर अवलंबून आहेत. मी त्यांच्यावर अवलंबून नाही (कारण मी सर्वांपेक्षा उच्च आहे). (7.12 देखील पाहा) (9.04) माझ्या दैवी गूढतेची शक्ती पाहा / माझे योग ऐश्वर्य पाहा; वास्तविक मी --- सर्व जीवांचा पालनपोषणकर्ता आणि निर्माता आहे --- पण तरी त्यांच्यावर अवलंबून नाही आणि तेही माझ्यावर अवलंबून नाहीत. (9.05) (जसे सोन्याची साखळी सोन्यावर अवलंबून असते, आणि दुधाचे पदार्थ दुधावर अवलंबून असतात. खरे तर सोन्याची साखळी सोन्यावर अवलंबून नसते; साखळी म्हणजेच सोने असते. त्याचप्रमाणे पदार्थ आणि ऊर्जा देखील भिन्न असूनही अभिन्न आहेत). ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याप्रमाणे सर्व जीव माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण (कोणत्याही संपर्काशिवाय किंवा कोणताही परिणाम न करता). (9.06)

उत्क्रांती आणि चक्रव्यूहाचा सिद्धांत

हे अर्जुना, 311 ट्रिलियन सौर वर्षाच्या चक्रानंतर (कल्पाच्या अंती) सर्व जीव माझ्या आदि-प्रकृति (प्राथमिक भौतिक स्वरूप) मध्ये विलीन होतात आणि हे अर्जुना पुढच्या चक्राच्या आरंभी मी त्यांना पुन्हा निर्माण करतो. (8.17 देखील पाहा) (9.07) माझ्या भौतिक प्रकृतीच्या मदतीने मी पुन्हा पुन्हा पुन्हा जीव तयार करतो. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या नियंत्रणाखाली आहे. (9.08) हे अर्जुना, ही निर्माण करण्याची कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत कारण मी या कृत्यांविषयी तटस्थ आणि अनासक्त आहे. (9.09) दिव्य गतिज ऊर्जा (माया) --- भौतिक प्रकृतीच्या साहाय्याने --- माझ्या देखरेखीखाली सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते; अशा प्रकारे हे अर्जुना, सृष्टीचक्र सुरूच आहे. (14.03 देखील पाहा) (9.10)

ज्ञानी आणि अज्ञानी लोकांचे मार्ग

जेव्हा मी मानवी स्वरुपात दिसतो तेव्हा अज्ञानी लोक माझा तिरस्कार करतात कारण ते अस्तित्वातील सर्व वस्तूंचा महान परमेश्वर म्हणून माझे अलौकिक स्वरूप ओळखत नाही (आणि मला एक सामान्य माणूस समजतात) आणि त्यांच्याकडे खोटी आशा, खोटी कृती, खोटे ज्ञान आणि राक्षसी व आसुरी भ्रामक गुण (16.04-18 पाहा) असतात (आणि मला ओळखू शकत नाही). (9.11-12) पण हे अर्जुना, महान आत्मे, ज्याच्याकडे दैवी गुण असतात (16.01-03 पाहा) ते मला अपरिवर्तनीय, सृष्टीचे भौतिक आणि आदि कारण म्हणून ओळखतात आणि दृढ मनाने आणि प्रेमळ भावाने माझी उपासना करतात. (9.13) दृढ निश्चयी लोक नेहमी माझा महिमा गातात, मला मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि भक्तीने मला वंदन करून माझी उपासना करतात. (9.14) काही आत्मज्ञान आत्मसात करून आणि प्रसार करून माझी उपासना करतात. इतर सर्व एकमेवाद्वितीय म्हणून, सर्वांचा स्वामी म्हणून विविध मार्गांद्वारे अनंताची उपासना करतात. (9.15)

सर्व काही परमात्म्याची अभिव्यक्ती आहे

मी कर्मकांड आहे, मी यज्ञ आहे, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण मीच आहे, मी वनौषधी आहे, मी मंत्र आहे, मी तूप आहे, मी अग्नी आहे आणि मी आहुतीही आहे. (4.24 देखील पाहा). मी विश्वाचा आधार, पिता, माता आणि पितामह आहे. मी ज्ञेय, पवित्र ध्वनी ‘ओम’ आहे, तसेच ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदही मीच आहे. मी ध्येय, समर्थक, प्रभु, साक्षी, निवास, आश्रयस्थान, मित्र, उत्पत्ती, प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीज आहे. (7.10 आणि 10.39 देखील पाहा) (9.16-18) मी उष्णता देतो. मी पाऊस रोखतो तसेच पाडतोही. मी अमृत, तसेच मृत्यूही मीच आहे. हे अर्जुना, मी परिपूर्ण आणि तात्कालिकही (सत् आणि असत्) आहे. (परमात्माच सर्वकाही बनलेला आहे. 13.12 देखील पाहा) (9.19)

भक्ती प्रेमाद्वारे मोक्षप्राप्ति

वेदात सांगितलेल्या विधींचे पालन करणारे, भक्तीचा सोमरस पिणारे, जे पापकर्मापासून शुद्ध झाले आहेत, ते स्वर्ग प्राप्तीसाठी चांगली कर्मे करून माझी उपासना करतात. त्यांच्या चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून, ते स्वर्गात जातात आणि स्वर्गातील भोग भोगतात. (9.20) याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग घेवून पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्यूलोकात परत येतात. अशा प्रकारे तीन वेदांच्या धर्माचे पालन केल्यावर, कर्मफलांसाठी काम करणारी व्यक्ती वारंवार जन्म आणि मृत्यू घेत राहते. (8.25 देखील पाहा) (9.21)

जे लोक अनन्य भक्तीभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात आणि माझी उपासना करतात, मी अशा भक्तांच्या आध्यात्मिक आणि भौतिक कल्याणाची सतत काळजी घेतो. (9.22) हे अर्जुना, जे भक्त इतर देवतांची उपासना करतात ते देखील माझी उपासना करतात पण अयोग्य मार्गाने. (9.23) कारण मी --- परमात्मा आहे - सर्व बलिदानाच्या सेवांचा (यज्ञ) भोक्ता आणि विश्वाचा स्वामी आहे. परंतु जे लोक माझे खरे, दिव्य स्वरूप जाणत नाही त्यांचे (जन्म आणि मृत्यूच्या वारंवार चक्रात) पतन होते. (9.24) जे देवतांची उपासणा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो; पूर्वजांचे उपासक पूर्वजांकडे जातात आणि भुतांचे उपासक भुतांकडे जातात; परंतु माझे भक्त माझ्याकडे येतात (आणि त्यांचा पुन्हा जन्म होत नाही). (8.16 देखील पाहा) (9.25)

परमेश्वर प्रेम आणि भक्तीने अर्पण केलेले स्वीकारतो आणि ग्रहण करतो

जो कोणी मला एक पान, एक फूल, एक फळ किंवा पाणी भक्तीने अर्पण करतो, मी शुद्ध मनाने आणि भक्तीने अर्पण केलेले स्वीकारतो आणि खातो. (9.26) हे अर्जुना, तू जे काही कर्म करतोस, जे जे खातोस, पवित्र हवनासाठी जे काही अर्पण करतोस, जे काही दान करतोस आणि जे काही तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. (12.10,18.46 देखील पाहा) (9.27) याप्रमाणे या संन्यास-योगाने कर्मबंधनाच्या शुभाशुभ फलातून तू मुक्त होशील. मुक्त झाल्यावर, मला येवून मिळशील. (9.28)

कोणीही अक्षम्य पापी नाही

मी सर्व प्राण्यांमध्ये समान उपस्थित आहे. मी कोणाचा द्वेष करत नाही किंवा पक्षपातही नाही. परंतु जे लोक प्रेमाने आणि भक्तीने माझी उपासना करतात ते माझ्या अत्यंत जवळचे आहेत आणि मीसुद्धा त्यांच्या अगदी जवळ आहे. (7.18 देखील पाहा) (9.29) जरी कोणी अत्यंत पापी व्यक्ती माझी एकल-भावना, प्रेमळ भक्तीने उपासना करत असेल तर तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असल्यामुळे अशा व्यक्तीला देखील साधूच मानले पाहिजे. (9. 30) अशी व्यक्ती लवकरच धर्मात्मा होते आणि शाश्वत शांती प्राप्त करते. हे अर्जुना, माझ्या भक्तांचा कधीही विनाश किंवा पतन होत नाही हे लक्षात ठेव. (9.31)

भक्तीमय प्रेमाचा मार्ग सोपा आहे

हे अर्जुना, जे प्रेमळ भक्तीने माझा आश्रय घेतात मग ते स्त्रिया, वैश्य, शुद्र व कुकर्म करणारे असले तरीही केवळ आत्मसमर्पण करून परम धामाची प्राप्ती करू शकतात. (18.66 देखील पाहा) (9.32) तर मग पवित्र ब्राह्मण आणि धर्माभिमानी राजर्षींना परमात्मा मिळविणे अगदी सोपे असले पाहिजे. म्हणूनच, हे आनंदविरहित आणि क्षणिक मानवी जीवन प्राप्त करून, माझी नेहमीच प्रेमळ भक्तीने उपासना केली पाहिजे. (9.33) आपले मन माझ्यावर स्थिर कर, माझ्यावर एकनिष्ठ हो, माझी उपासना कर आणि माझ्यासमोर नतमस्तक हो. म्हणूनच मला स्वत: शी एकरूप करून मला सर्वोच्च लक्ष्य आणि एकमेव आश्रयस्थान ठरवून तू नक्कीच माझ्याकडे येशील. (9.34)

10.  परिपूर्णतेचे प्रकटीकरण

परात्पर प्रभू म्हणाले: हे अर्जुना, पुन्हा एकदा माझे सर्वोच्च शब्द ऐक, जे मी मला अत्यंत प्रिय अशा तुला, तुझ्याच भल्यासाठी सांगत आहे. (10.01)

देव प्रत्येक गोष्टीचे मूळ आहे

देवतांना किंवा महान ऋषींना माझे मूळ माहित नाहीत कारण मी सर्व देव आणि महान ऋषींचे सुद्धा मुळ आहे. (10.02) जो मला अजन्मा, अनादी आणि सर्व विश्वाचा स्वामी म्हणून ओळखतो त्याला नश्वरांमध्ये ज्ञानी मानले जाते आणि तो कर्माच्या बंधनातून मुक्त होते. (10.03) भेदभाव, आत्मज्ञान, भ्रमातून मुक्तता, क्षमा, सत्यता, मन व इंद्रियांवर नियंत्रण, स्थिरता, सुख, दु:ख, जन्म, मृत्यू, भीती, निर्भयता, अहिंसा, शांतता, समाधानीस्थ, तपस्या, दानशूरता, कीर्ती-अपकीर्ती --- मानवांमध्ये हे विविध भाव माझ्यापासूनच निर्माण होतात. (10.04-05) जगातील सर्व प्राणी ज्यांच्यापासून जन्मले आहेत असे सप्तर्षी, चार सनक आणि चौदा मनू, माझ्यामधून उत्पन्न झालेले आहेत. (10.06)

ज्याला खरोखरच माझे अवतार आणि योगशक्ती समजली आहे, तो माझ्याशी स्थिर भक्तीने एकरूप आहे. याबद्दल कोणतीही शंका नाही. (10.07) मी सर्वांचा मूळ आहे. सर्व काही माझ्यामधूनच उत्पन्न होते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते प्रेम आणि भक्तीने मला भजतात. (10.08) माझे भक्त सदैव संतुष्ट आणि आनंदित असतात. त्यांची मने माझ्यामध्ये लीन राहतात आणि त्यांचे आयुष्य मला शरण आलेले असते. माझ्याबद्दल चर्चा करून ते नेहमीच एकमेकांना ज्ञान देतात. (10.09)

देव आपल्या भक्तांना ज्ञान देतो

जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी तत्त्वज्ञानविषयक ज्ञान आणि समज देतो – ज्यामुळे ते मला प्राप्त करतात. (10.10) त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी, त्यांच्या अंतरंगात चैतन्य म्हणून वास करणारा मी, दिव्य ज्ञानरूपी दिव्याने, अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या त्यांच्या अंतरंगातील अंधाराचा नाश करतो. (10.11) अर्जुन म्हणाला: तुम्ही परमात्मा, परमधाम, परम पवित्र, चिरंतन ईश्वरीय आत्मा, आदि देव, अजन्मा आणि सर्वव्यापी आहात. सर्व ऋषीमुनी असेच सांगतात. दैवी ऋषी नारद, असित, देवल, व्यास आणि आता तुम्ही स्वतः मला तेच सांगत आहात. (10.12-13)

वास्तवाचे वास्तविक स्वरुप कोणालाही माहिती नसते

हे कृष्णा, तुम्ही मला जे सर्व सांगितले आहे ते पूर्णतया सत्य आहे, यावर माझा विश्वास आहे. हे परमेश्वरा, देवता किंवा दानव तुमचे वास्तविक स्वरूप पूर्णपणे जाणू शकत नाहीत. (4.06 देखील पाहा) (10.14) हे सृष्टीकर्ता हे परमेश्वरा, देवाधिदेव, आदिपुरूष आणि जगत्पती, खरोखर तुम्हीच केवळ तुम्हाला जाणू शकता. (10.15) म्हणून, ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ब्रह्मांड व्यापून राहिला आहात, त्या --- अलौकिक ऐश्वर्याचे संपूर्ण वर्णन केवळ तुम्हीच करू शकता. (10.16) हे परमेश्वरा, सतत चिंतन करून मी तुम्हाला कसे जाणू? प्रभु, मी कोणकोणत्या विविध रुपात तुमचा विचार करू शकतो? (10.17) हे परमेश्वरा, तुमची योगशक्ती आणि ऐश्वर्याचे/विभूतींचे कृपया पुन्हा विस्ताराने वर्णन करून सांगा, कारण तुमचे अमृतमयी शब्द ऐकून माझी तृप्ती होत नाही. (10.18)

सर्व काही परिपूर्णतेची अभिव्यक्ती आहे

परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, आता मी तुला माझ्या प्रमुख दिव्य अभिव्यक्तींबद्दल समजावून सांगेन कारण माझ्या अभिव्यक्ती अनंत आहेत. (10.19) हे अर्जुना, मी सर्व प्राणिमात्राच्या अंतर्यामी स्थित असणारा आत्मा आहे. मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. (10.20) मी पालनकर्ता आहे, तेजस्व्यांमध्ये मी देदीप्यमान सूर्य आहे, मी वायूचा अलौकिक नियंत्रक (मरीची) आहे, ताऱ्यांमध्ये मी चंद्र आहे. (10.21) मी वेद(वेदांमध्ये सामवेद) आहे, मी देवता आहे(देवतांमध्ये मी इंद्र आहे), मी इंद्रियातील मन आहे, मी प्राणीमात्रांमधील चेतना आहे. (10.22) मी भगवान शिव आहे, मी संपत्तीचा देव (कुबेर) आहे, मी अग्नीदेव आणि पर्वतांचा देव(सुमेरू) आहे. (10.23) हे अर्जुना, मी देवतांचा पुरोहित (बृहस्पती) व देवसेनेचा सेनापती (कार्तिकेय) आहे. जलाशयांमध्ये मी सागर आहे. (10.24) मी महान ऋषींमध्ये भृगु आहे; शब्दांपैकी मी दिव्य ओम चा एकाक्षरी ध्वनी आहे; मी आध्यात्मिक शास्त्रामध्ये मी मंत्राची (जप) मूक पुनरावृत्ती आहे; आणि पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. (10.25)

दैवी अभिव्यक्तींचे थोडक्यात वर्णन

मी वृक्षांमध्ये पवित्र अंजीर/पिंपळ वृक्ष आहे, षींमध्ये नारद आणि इतर सर्व देवता म्हणजे मीच आहे. (10.26) मला प्राण्यांमध्ये दैवी प्राणी आणि मनुष्यांमधील राजा म्हणून जान. मी शस्त्रांमध्ये वज्र आहे आणि प्रजोत्पादणास कारण असणारा कामदेव मी आहे. (10.27-28) मी जलदेवता (वरून) आणि मानस आहे. मी मृत्यूदेवता (यम) आहे. माझा महान भक्त प्रल्हाद मी आहे. रोग बरे करणाऱ्यांमध्ये मी मृत्यू आहे, पशूंमध्ये सिंह आणि पक्ष्यांमध्ये पक्षांचा राजा (गरूड) आहे. (10.29-30) पवित्र करणाऱ्यांमध्ये मी वारा आहे आणि योद्धांमध्ये भगवान राम मी आहे. मत्स्यांमध्ये मी मर आणि नद्यांमध्ये पवित्र गंगा नदी आहे. (10.31)

हे अर्जुना, मी सृजनाचा आदी, मध्य आणि अंतही आहे. ज्ञानामध्ये मी परात्पर आत्म्याचे ज्ञान आहे. मी तर्कशास्त्रज्ञांचे तर्कशास्त्र आहे. (10.32) मी अक्षरांमध्ये ‘अ’कार हे आहे. समासांतील मी द्वंद्व समास आहे. मी अविनाशी काळ आहे. मी सर्वांचा आधारभूत आहे आणि मला सर्व बाजूंनी चेहरे आहेत (किंवा मी सर्वत्र अस्तित्वात आहे) (10.33) मी सर्वहरण करणारा मृत्यू आहे आणि भविष्यातील प्राण्यांचे मूळसुद्धा आहे. कीर्ति, ऐश्वर्य, वाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा या सात देवता मी आहे. (10.34) वैदिक स्तोत्रांमध्ये मी बृहत्साम आहे. वैदिक मंत्रांमध्ये मी गायत्री मंत्र आहे. महिन्यांमध्ये मी (मार्गशीर्ष) नोव्हेंबर-डिसेंबर आहे, तूंमध्ये मी वसंत आहे. (10.35) फसवणाऱ्यांमध्ये मी द्यूत आहे, भव्यतेमधील वैभव, विजयीचा विजय, संकल्प करणाऱ्यांचा संकल्प आणि चांगल्याचा चांगुलपणा मी आहे. (10.36)

मी वृष्णी कुटुंबातील कृष्ण, पांडवांमध्ये अर्जुन, मुनींमध्ये व्यास आणि कवींमध्ये उशना आहे. (10.37) मी सत्ताधीशांची शक्ती आहे, विजयाचा शोध घेणाऱ्यांमधील राजेशाही मी आहे, मी रहस्यांमधील मौन आहे, आणि ज्ञानीजनांमधील आत्म-ज्ञान आहे. (10.38) हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांचे बीज आहे. माझ्याशिवाय कोणतीही चराचर सृष्टी अस्तित्त्वात राहू शकत नाही. (7.10 आणि 9.18 देखील पाहा) (10.39)

अभिव्यक्त स्वरूप हा परिपूर्णतेचा अगदी लहान भाग आहे

हे अर्जुना, माझ्या दिव्य अभिव्यक्तींना अंत नाही. माझ्या दिव्य अभिव्यक्तींचे हे फक्त थोडक्यात वर्णन मी केले आहे. (10.40) सर्व ऐश्वर्यवान, तेजस्वी आणि बलशाली अभिव्यक्ती --- माझ्या तेजाच्या अगदी लहान अंशातून उत्पन्न झाल्या आहेत. (10.41) हे अर्जुना, ह्या सविस्तर ज्ञानाची काय गरज आहे? मी सतत माझ्या दिव्य शक्तीच्या (योगमाया) लहान भागाद्वारे संपूर्ण विश्वाचे पालन करतो. (10.42)

11. विश्वरूपदर्शन

अर्जुन म्हणाला: या परमगुह्य परमात्म्याबद्दल तुम्ही कृपावंत होवून मला जो उपदेश केला आहे, ते ऐकून माझा भ्रम नष्ट झाला आहे. (11.01) हे कृष्णा, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल तसेच तुमच्या अविनाशी वैभवाविषयी मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे. (11.02)

ईश्वराची दृष्टी हे साधकाचे अंतिम लक्ष्य आहे

हे परमेश्वरा, तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे तुम्ही आहात, हे परमात्म्या, तरीही मला तुमचे वैश्विक रूप पाहाण्याची इच्छा आहे. (11.03) हे परमेश्वरा, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, मला तुमचे ते अमर्याद विश्वरूप कृपया दाखवा. (11.04) परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, माझे विविध रंगांची आणि आकारांची माझी शेकडो आणि हजारो बहुविध दैवी रूपे पाहा. सर्व देवदेवता आणि यापूर्वी कधीही न पाहिलेले अनेक चमत्कार पाहा. तसेच सजीव, निर्जीव आणि इतर जे काही तू पाहू इच्छितोस ते सर्व माझ्या शरीरावर एकाच ठिकाणी पाहा. (11.05-07) परंतु तुझ्या वर्तमान नेत्रांनी तू मला पाहू शकणार नाही; म्हणूनच, मी तुला माझे दैवी सामर्थ्य आणि वैभव पाहण्यासाठी दिव्य दृष्टी देतो. (11.08)

भगवान श्रीकृष्ण आपले वैश्विक रूप दाखवतात

संजया म्हणाला: हे राजा, हे बोलल्यानंतर योगातील गूढ शक्तीचे महान परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला त्यांचे परम भव्य रूप प्रकट केले. (11.09) अर्जुनाने परमेश्वराच्या या विश्वरूपात असंख्य मुखे आणि नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक दैवी अलंकारांनी विभूषित झालेले, अनेक दिव्य शस्र धारण केलेले, दैवी माला आणि वस्त्र परिधान केलेले होते. अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिलेला होता. सर्व बाजूंनी मुख असलेले हे रूप सर्वच बाबतीत अद्भुत होते. (11.10-11) आकाशामध्ये एकाच वेळी हजारो सूर्यांचा उदय झाला तरी त्यांचे तेज परमात्म्याच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकणार नाही. (11.12) अर्जुनाने त्या वेळी देवाधिदेव कृष्णाच्या दिव्य शरीरामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली (एकामध्ये अनेक आणि अनेकांमध्ये एक) परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. (13.16 आणि 18.20 देखील पाहा) (11.13)

देव पाहण्यास व्यक्ती तयार किंवा पात्र नाही

(परमेश्वराचे वैश्विक रूप पाहून) अर्जुन आश्चर्यचकित झाला; आणि त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने परमेश्वराला नमन केले आणि आपले हात जोडून प्रार्थना केली. (11.14) अर्जुन म्हणाला: हे परमेश्वरा, मी तुमच्या दिव्य देहात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर सर्व जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषींना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. (11.15) हे विश्वेश्वरा, मी असंख्य रूपांमध्ये तुम्हालाच पाहत आहे, या रूपामध्ये असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्र आहेत. हे विश्वरूप, तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. (11.16) मी तुम्हाला तुमचे अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. अत्यंत तेज:पुंज असल्याने हे रूप पाहणे कठीण आहे. हे तेज सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापले आहे. (11.17)

माझा विश्वास आहे की तुम्ही परमात्मा आहात. तुम्ही संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान आहात. तुम्ही चिरंतन जीव आणि शाश्वत व्यवस्थेचे रक्षणकर्ता (धर्म) आहात. (11.18) मी असीम सामर्थ्यवान तुम्हाला पाहत आहे; तुम्ही आदी, मध्य किंवा अंत रहित आहात; तुमचे अनेक बाहू आहेत; सूर्य आणि चंद्र तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत आहे. (11.19) हे परमेश्वरा, स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणी सर्व दिशा तुम्ही व्याप्त केल्या आहे. तुमचे हे अद्भुत आणि उग्र रूप पाहून, तिन्ही लोक भीतीने थरथर कापत आहेत. (11.20) सर्व देवता तुम्हाला शरण येवून तुमच्यामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांच्यापैकी काही जण भयभीत झाल्यामुळे तुमची प्रार्थना करत आहेत. महर्षींचा एक समूह तुमची विपुल स्तुती करून नमन करत आहे आणि पूजा करत आहे. (11.21) सर्व देवता विस्मित होवून तुम्हाला पाहत आहेत. तुमचे अनेक मुखे, नेत्र, बाहू, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अक्राळविक्राळ दाढा असलेले भयंकर असे महान रूप पाहून; सर्व लोक भीतीने थरथर कापत आहेत आणि म्हणून मी ही व्याकूळ झालो आहे. (11.22-23)

विश्व रूप पाहून अर्जुनाला भय वाटत आहे

हे कृष्णा, आकाशास भिडलेली तेजस्वी अनेक रंगानी युक्त पसरलेली तोंडे, आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून मी घाबरलो आहे आणि मी मानसिक शांती किंवा धैर्य ठेवू शकत नाही. (11.24) विश्वाला गिळंकृत करणारी तुमची प्रज्वलित मुखे, त्यातील अक्राळविक्राळ दाढा पाहून मला दिशाहीनपणा जाणवतो आहे आणि मला अस्वस्थ वाटत आहे. हे परमेश्वरा, देवाधिदेव, जगन्निवास, माझ्यावर दया करा. (11.25) माझे सर्व चुलत बंधू व इतर राजांचे सैन्य आणि दुसर्‍या बाजूचे योद्धे तसेच आमच्या बाजूला असलेले प्रमुख योद्धेसुद्धा भीतीने अक्राळविक्राळ दाढा असलेल्या तुमच्या मुखात त्वरेने प्रवेश करीत आहेत. काहीजण दाढांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. (11.26-27) मर्त्य जगातील हे महान योद्धे तुमच्या प्रज्वलित मुखामध्ये शिरत आहेत जसे की नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात. (11.28) ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशासाठी प्रदीप्त अग्नीमध्ये वेगाने प्रवेश करतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक आपल्या नाशासाठी द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे. (11.29) हे कृष्णा, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व जगाला चाटत आहात, सर्व बाजूंनी गिळंकृत करत आहात. तुमच्या प्रखर तेजामुळे संपूर्ण विश्व व्यापून आणि ते भस्म होत आहे. (11.30) हे देवाधिदेव, कृपया मला सांगा की उग्ररूपधारी तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला प्रणाम करतो, कृपाळू व्हा! मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहित नाही. (11.31)

आपण फक्त एक दैवी साधन आहोत

सर्वोच्च परमेश्वर म्हणाले: जगाचा विनाश करणारा महाकाल मी आहे. मी येथे या सर्व लोकांचा संहार करण्यासाठी आलो आहे. युद्धामध्ये तू सहभाग घेतला नाहीस तरीही, विरोधी सैन्या उभे असलेल्या सर्व योद्धांचा विनाश होणार आहे. (11.32) म्हणून उठ आणि युद्धासाठी तयार हो. शत्रूंवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. या सर्व योद्ध्यांचा मी आधीच विनाश केला आहे. हे अर्जुना, तू फक्त माझे निमित्तमात्र आहेस. (11.33) मी पूर्वीच मारलेल्या या महान योद्ध्यांचा वध कर. व्यथित होवूको. युद्धामध्ये तू शत्रूंना निश्चित जिंकशील; म्हणून, लढ! (11.34)

अर्जुनाच्या वैश्विक स्वरुपाच्या प्रार्थना

संजया म्हणाला: कृष्णाचे हे वचन ऐकून, मुकुट घातलेल्या थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतित स्वरात म्हणाला. (11.35) अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, तुमच्या नाम श्रवणाने आणि स्तुती करून जग हर्षोल्हासित होते आणि राक्षस मात्र भयभीत होवून इतस्तत: पळतात. सिद्ध पुरूष तुमची उपासना करतात. हे सर्व योग्यच आहे. (11.36) त्यांनी तसे का करू नये?--- हे महान आत्मा --- तुला नमन का करु नये. भौतिक जगाचा निर्माता जो ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे अनंता, हे देवाधिदेव, हे जगन्निवास, तूच सत (शाश्वत) आणि असत (तात्कालिक) आहेस आणि परमात्मा आहेस जो सत आणि अस या दोन्हीच्या पलीकडे आहे. (9.19 आणि 13.12 देखील पाहा) (11.37)

तुम्ही आदिपुरूष भगवान, सर्वात अनात्न पुरूष आहात. तुम्ही सर्व विश्वाचे परम आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ, जे जे ज्ञेय आहे ते देखील तुम्हीच आहात आणि परम धाम आहात. हे अनंतरूपा, तुम्हीच सर्व विश्व व्यापले आहे. (11.38) तुम्ही मृत्यू, अग्नी, वायू, जल देवता, चंद्रदेव आणि ब्रह्मा, निर्माता, तसेच ब्रह्मदेवाचे जनक आहात. तुम्हाला माझा सहस्रश: नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार असो. (11.39) तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी माझा नमस्कार असो. हे अनंतवीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात; म्हणूनच, तुम्ही सर्वत्र आणि सर्वकाही आहात. (11.40)

तुम्हाला फक्त मित्र समजून, आणि तुमची महानता न जाणता, मी नकळत तुम्हाला प्रेमळपणे किंवा चुकीने हे कृष्णा, हे यादवा, हे सखे इ. म्हणून संबोधले आहे. (11.41) खेळताना, शय्येवर शय्या करतांना, बसून किंवा एकत्र भोजन करतांना, एकांतात किंवा अनेकांसमक्ष, विनोदांमध्ये मी तुमचा कोणत्याही प्रकारे अपमान केला असेल; हे कृष्णा, अच्चुता, माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा कर. (11.42) तुम्ही या चराचर सृष्टीचे जनक आहात आणि परमपूज्य गुरु आहात, की ज्यांची उपासना केली पाहिजे. तिन्ही लोकांत कोणीही तुमच्या समान नाही; परमेश्वरा, तुझ्यापेक्षा महान असा कोणीच असू शकत नाही. (11.43)

म्हणून, हे प्रेमळ परमेश्वरा, मी खाली वाकून आणि साष्टांग प्रणाम करुन तुमच्या कृपेची प्रार्थना करतो. ज्याप्रमाणे एक पिता पुत्राचे, एक मित्र दुसऱ्या मित्राचे, एक पती आपल्या पत्नीचे अपराध सहन करतात त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा. (11.44) पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहून मला आनंद झाला आहे परंतु तरीही भयाने माझे मन व्याकूळ झाले आहे. म्हणून, हे देवाधिदेव, हे जगन्निवास, माझ्यावर दया करा आणि तुमचे चतुर्भुज रूप प्रकट करा. (11.45)

व्यक्ती कोणत्याही स्वरूपात देव पाहू शकते

मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि हातात गदा आणि चक्र धारी रूप पाहण्याची माझी इच्छा आहे. म्हणून, परमेश्वरा, हे सहस्रबाहू, विश्वरुपातून, कृपया चतुर्भुज रुपात या. (11.46) परात्पर भगवान म्हणाले: हे अर्जुना, तुझ्यावर प्रसन्न झाल्याने मी तुला माझ्या अंतरंगी योगिक शक्तींद्वारे --- हे विशिष्ट, सर्वोच्च, अत्यंत तेजोमय, वैश्विक, अनंत आणि आद्य मूळ रूप दाखविले आहे, जे तुझ्याशिवाय कधीही कोणीही पाहिले नव्हते. (11.47) हे अर्जुना, वेदाध्ययन, बलिदा, दा, विधी, कडक तपश्चर्या करूनही मला या मानवी जगात तुझ्याशिवाय इतर कुणीही या वैश्विक रूपात पाहिलेले नाही. (11.48)

हे माझे असे भयंकर रूप पाहून भयभीत होऊ नको. निर्भय आणि आनंदी मनाने, आता माझे चतुर्भुज रूप पाहा. (11.49) संजय म्हणाला: अर्जुनाला असे बोलून कृष्णाने आपले चतुर्भुज रूप प्रकट केले. आणि मग सौम्य रूप धारण करून भगवान श्रीकृष्णाने भयभीत अर्जुनाला धीर दिला. (11.50) अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, तुझे हे सुंदर मानवी रूप पाहून मी आता शांत झालो आहे आणि मी आपल्या पूर्व स्थितीवर आलो आहे. (11.51)

देव भक्तीयुक्त प्रेमाने पाहिला जाऊ शकतो

सर्वोच्च परमेश्वर म्हणाले: आता तू माझे पाहत असलेल्या चतुर्भुज रूपाचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवतासुद्धा हे मधुर रूप पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. (11.52) तू पाहत असलेले चतुर्भुज रूप केवळ वेदांच्या अभ्यासाद्वारे किंवा कठोर तपस्येद्वारे, किंवा दानाने किंवा यज्ञांच्याद्वारे देखील जाणणे शक्य नाही. (11.53) तथापि, केवळ अनन्य भक्तीयोगाने, मी या रूपात दिसू शकतो, मला जाणणे शक्य आहे आणि हे अर्जुना केवळ याच मार्गाने तू मला मिळवू शकतो. (11.54) जो सर्व कर्मे मला समर्पित करतो आणि मी ज्याचे परम ध्येय आहे, जो माझा भक्त आहे, ज्याला कसलीही आसक्ती नाही आणि कोणत्याही द्वेषापासून मुक्त आहे - हे अर्जुना, तो मला प्राप्त करतो. (8.22 देखील पहा) (11.55)

12. भक्तीचा मार्ग

एखाद्याने वैयक्तिक की असामान्य देवाची उपासना करावी?

अर्जुन म्हणाला: या पैकी कोणास योगाचे उत्तम ज्ञान आहे --- असे लोक की जे दृढ भक्तीने सतत तुमची उपासना करतात (तुमची कृष्ण म्हणून तुमची उपासना करतात), किंवा जे अव्यक्त परमात्म्याची उपासना करतात? (12.01) परमेश्वर म्हणाले: जे दृढ निश्चय करून परम श्रद्धेने, माझ्यावर मन एकाग्र करून सगुण रूपात म्हणून माझी उपासना करतात, ते माझ्या दृष्टीने उत्तम योगी आहेत. (6.47 देखील पहा) (12.02) जे सर्व इंद्रियांवर संयम ठेवून सर्व परिस्थितीत समबुद्धी ठेवून, अपरिवर्तनीय, गूढ, अदृश्य, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय आणि अचल परमात्म्याची उपासना करतात आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी गुंतलेले असतात ते माझीच प्राप्ती करतात. (12.03-04)

भगवंताच्या वैयक्तिक स्वरूपाची उपासना करण्याची कारणे

ज्यांचे मन परमात्म्याच्या, अव्यक्त निर्गुण, रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांच्यासाठी आत्म-साक्षात्कार होणे अधिक अवघड आहे; कारण अव्यक्त स्वरूप समजणे देहधारी जीवांसाठी अतिशय दुष्कर आहे. (12.05) परंतु जे अनन्यभावाने सगुण रूपात म्हणून माझी उपासना करतात, माझे चिंतन करतात; त्यांची सर्व कर्मे मला अर्पण करतात, मला सर्वोच्च मानतात आणि माझे ध्यान करतात; हे अर्जुना, मी त्वरेने त्यांचे जन्ममृत्यूच्या संसार सागरातून उद्धार करतो. (12.06-07)

भगवंताकडे जाण्याचे चार मार्ग

म्हणून, माझ्यावर तुझे लक्ष केंद्रित कर आणि तुझी बुद्धी केवळ माझ्या ठायी युक्त कर (ध्यान आणि चिंतनाद्वारे). त्यानंतर तू नक्कीच मला प्राप्त करशील. (12.08) जर तू माझ्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असशील तर, हे अर्जुना, तुला अनुरुप (इतर कोणत्याही) आध्यात्मिक विधींद्वारे माझ्याकडे येण्याची इच्छा कर. (12.09) जर तू एखाद्या आध्यात्मिक विधींचे अनुसरण करण्यासही असमर्थ असशील तर माझ्याकरिता आपले कर्म कर. केवळ माझ्याकरिता कर्म केल्याने (केवळ एक सेवा म्हणून आणि माझ्या इच्छेसाठी, स्वार्थाशिवाय) तू परिपूर्णता प्राप्त करू शकशील. (9 .27, 18.46 देखील पाहा) (12.10) जर तू माझ्यासाठी कर्म करण्यास असमर्थ असशील तर केवळ माझ्या इच्छेला शरण जा आणि शुद्ध मनाने सर्व कर्मफलांचा त्याग कर (भगवंताची कृपा म्हणून कर्माचे जो काही परिमाण असेल तो शांतपणे स्वीकार). (12.11)

कर्मयोग हा उत्तम मार्ग आहे

केवळ धार्मिक विधीपेक्षा शास्त्राचे ज्ञान चांगले आहे; शास्त्र ज्ञानापेक्षा ध्यान करणे चांगले आहे; त्याग, किंवा कर्मफलाप्रति स्वार्थी आसक्तीचा त्याग करणे हे ध्यानापेक्षा चांगले आहे; कर्मफलत्यागामुळे शांती प्राप्त होते. (18.02, 18.09 मध्ये त्यागाबद्दल अधिक पाहा) (12.12)

भक्ताची वैशिष्ट्ये

जो कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही, जो मैत्रीपूर्ण व दयाळू आहे, जो “मी” आणि “माझे” या कल्पनेपासून मुक्त आहे, जो सुख-दु: खात समभाव राखतो, क्षमाशील आहे; आणि योगी जो सदैव समाधानी आहे, ज्याने मनाला वश केले आहे, ज्यांचे संकल्प दृढ आहेत, ज्याचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थित आहे, जो माझा भक्त आहे - तो मला अत्यंत प्रिय आहे. (12.13-14) ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतरांमुळे उद्विग्न होत नाही, जो आनंद, मत्सर, भीती आणि चिंतामुक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे.  (12.15) जो निरपेक्ष, शुद्ध, विद्वान, निःपक्षपाती आणि चिंतामुक्त आहे; जो सर्व कार्यांमध्ये स्वत:ला कर्ता मानत नाही --- असा भक्त मला प्रिय आहे. (12.16) जो हर्षितही होत नाही किंवा दु: खही करीत नाही, जो आसक्त नाही किंवा अनासक्तही नाही, ज्याने शुभाशुभाचा त्याग केला आहे आणि भक्तीने परिपूर्ण आहे --- तो मला प्रिय आहे. (12.17) जो मनुष्य मित्र किंवा शत्रू यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत-उष्ण, सुख-दु:खामध्ये समभाव राखतो; जो आसक्तीपासून मुक्त आहे; ज्याच्यासाठी स्तुती किंवा निंदा एकसमान आहेत, स्थिर, आपल्याकडे जे काही आहे त्या समाधानी आहे, स्थानाशी जो आसक्त नाही (देश, किंवा घर) शांत, आणि भक्तीने परिपूर्ण आहे --- तो मला अत्यंत प्रिय आहे. (12.18-19)

एखाद्याने ईश्वरी गुण विकसित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे

परंतु ते श्रद्धाळू भक्त मला अत्यंत प्रिय आहेत जे मला त्यांचे परमलक्ष्य मानून आणि वर उल्लेख केलेल्या नैतिक मूल्यांचे पालन करतात (किंवा प्रामाणिकपणे विकसित करण्याचा प्रयत्न करतात). (12.20)

13. निर्माण आणि निर्माणकर्ता

निर्माणाचा सिद्धांत

परम भगवान म्हणाले: हे अर्जुना, हे भौतिक शरीर, एक लहान विश्व आहे, यालाच क्षेत्र म्हटले जाते. हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. (13.01) हे अर्जुना, मला सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच अलौकिक (किंवा तत्त्वज्ञानविषयक) ज्ञान मानले जाते. (13.02) क्षेत्र काय आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती कुठे होते, क्षेत्रज्ञ कोण आहे आणि त्याचे सामर्थ्य काय आहे --- हे सर्व माझ्याकडून थोडक्यात ऐक. (13.03) द्रष्ट्यांनी वैदिक स्तोत्रांमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केले आहे आणि ब्रह्मसूत्रामध्ये निर्णायक आणि पटणाऱ्या तथ्यांसहित प्रस्तुत केले आहेत. (13.04) प्राथमिक भौतिक प्रकृती, लौकिक बुद्धी, "मी" पणा किंवा अहंकार, पंचमहाभूते, दहा इंद्रिये, मन, पाच इंद्रियविषय; आणि इच्छा, द्वेष, आनंद, वेदना, भौतिक शरीर, देहभान आणि संकल्प --- अशाप्रकारे संपूर्ण क्षेत्र त्याच्या रूपांतरासहित वर्णन केले जाते. (7.04 देखील पहा) (13.05-06)

निर्वाणाचे साधन म्हणून चौपदरी उदात्त सत्य

नम्रता, निरहंकार, अहिंसा, क्षमा, प्रामाणिकपणा, गुरुची सेवा, शुद्धता (विचार, शब्द आणि कृती), सहनशीलता, आत्मसंयम; आणि इंद्रियविषयांचा त्याग, मिथ्या अहंकारारहित; जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू मधील वेदना आणि दु: ख जाणणे; (13.07-08) कुटुंबातील सदस्य, घरदार यांपासून अनासक्ती; वांछित व अवांछित प्राप्तीनंतर शांत राहणे; आणि माझ्याप्रति निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासाची आवड, सामाजिक मेळावे आणि गप्पागोष्टीपासून लांब राहणे, परमात्म्याचे ज्ञान आत्मसात करणे आणि सर्वत्र सर्वव्यापी परमेश्वर पाहणे --- यास ज्ञान असे म्हणतात. याविरुद्ध जे काही आहे ते म्हणजे अज्ञान. (13.09-11)

ईश्वराचे वर्णन बोधकथेद्वारे केले जाऊ शकते आणि इतर कोणत्याही प्रकारे नाही

ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला पूर्ण वर्णन करून सांगतो जे जाणल्याने व्यक्तीला अमरत्व/परमानंद मिळते. अनादी परमात्मा हा शाश्वत (सत) किंवा तात्कालिकही (असत) नाही असे म्हणतात. (9.19, 11.37, and  आणि 15.18 देखील पाहा) (13.12) परमात्म्याचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान सर्वत्र आहेत कारण तो सर्वव्यापी आणि सर्वत्र आहे. (13.13) तो सर्व इंद्रिय विषयांचा जाणकार आहे; पण तरीही तो इंद्रियरहित आहे. सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी अनासक्त आहे. तो प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याच बरोबर सजीव अस्तित्वाद्वारे प्राकृतिक गुणांचा भोक्ताही आहे. (13.14) तो सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेरही आहे. तो सूक्ष्म असल्यामुळे समजण्यायोग्य नाही. आणि तो सर्वव्यापी असल्यामुळे, --- अंतरंगात स्थित असलेला तो सर्वात जवळ आहे; तसेच परमधामात निवास करणारा तो सर्वात दूरही  आहे.  (13.15) परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो ज्ञेय आहे, तोच सृष्टीनिर्माता ब्रह्मा; पालनकर्ता विष्णू; आणि संहारकर्ता शिव असल्याचे जाणले पाहिजे. (11.13 आणि 18.20 देखील पाहा) (13.16)

परमात्मा हा सर्व प्रकाशाचा स्रोत आहे. तो अंधकाराच्या अतीत (अज्ञान किंवा मायेचा) असल्याचे म्हटले जाते. तो आत्मज्ञान आहे, ज्ञेय आहे, आणि सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात (किंवा चेतना म्हणून हृदय (18.61 देखील पाहा) ) स्थित आहे, त्याला आत्म-ज्ञानाद्वारे जाणले पाहिजे. (15.06 आणि 15.12 देखील पाहा) (13.17) अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय यांचे मी थोडक्यात वर्णन केले आहे. हे समजून घेतल्यावर माझा भक्त माझ्या परम निवासस्थानास पोहोचतो. (13.18)

परमात्मा, आत्मा, भौतिक प्रकृती आणि स्वतंत्र आत्म्याचे वर्णन

हे जाणून घे की भौतिक प्रकृती आणि आध्यात्मिक जीव हे दोन्ही अनादी आहेत. सर्व अभिव्यक्ती तसेच मन आणि पदार्थ यांच्या तीन अवस्था, ज्याला गुण म्हणतात, ते भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. प्रकृती हीच भौतिक शरीरे तसेच ज्ञान आणि कार्याचे अकरा अवयव निर्माण करण्याचे कारण असल्याचे म्हटले जाते. पुरुष (चैतन्य, आत्मा) सुख आणि दु:ख अनुभवण्याचे कारण म्हटले जाते. (13.19-20) प्रकृतीशी संग करून पुरूष भौतिक प्रकृतीचे त्रिगुणात्मक पदार्थांना उपभोगतो. गुणांशी संलग्नतेमुळे (अज्ञानामुळे झालेल्या पूर्वीच्या कर्मामुळे) चांगल्या आणि वाईट योनीमध्ये जीव जन्म घेतात. (13.21)

शरीरातील शाश्वत अस्तित्व (ब्रह्मा, आत्मा) याला साक्षी, मार्गदर्शक, सहाय्यक, आनंद उपभोक्ता, महान परमेश्वर आणि परमात्मा असेही म्हणतात. (13.22) जे लोक खरोखरच अध्यात्मिक अस्तित्व (पुरुष) आणि भौतिक स्वरूप (प्रकृति) आणि त्रिगुण जाणतात, त्यांची वर्तमान स्थिती कशीही असली तरी ते मोक्षप्राप्ती करतात. (13.23) काहीजण मन आणि बुद्धीद्वारे समजून घेतात की त्यांच्या अंतरंगात परमात्म्याचा वास आहे, की जो ध्यान किंवा तत्वज्ञानाद्वारे किंवा कर्मयोगाने शुद्ध केलेला आहे. (13.24)

केवळ श्रद्धेने निर्वाण होऊ शकते

इतर लोक ज्यांना ध्यान, ज्ञान आणि कर्मयोग माहित नाही; पण ते पवित्र शास्त्रात संत आणि षीमुनिंनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने देवाची उपासना करतात. त्यांनी ऐकलेल्या गोष्टींवर ठाम विश्वास ठेवल्यामुळे ते सुद्धा (जन्म) मृत्यूच्या पलीकडे जातात. (13.25) हे अर्जुना, जे काही जन्माला आलेले आहे सजीव किंवा निर्जीव / स्थावर-जंगम, ते द्रव्य आणि आत्मा / क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून उत्पन्न होतात, असे जाण. (7.06 देखील पाहा) (13.26) जो मनुष्य सर्व नश्वर जीवांमध्ये समान रूपाने अनंत परमात्म्याला पाहतो, तोरे पाहतो. (13.27)

काच परमेश्वराचे प्रत्येक जीवामध्ये समान अस्तित्त्व पाहत असल्यामुळे, मनुष्य कुणालाही त्रास देत नाही आणि त्यानंतरच परमधामास मिळतो. (13.28) ज्याला हे समजले की सर्व कामे केवळ भौतिक निसर्गाच्या (प्रकृती) शक्तीद्वारे (गुण) केली जातात आणि म्हणून तो स्वतःला कर्ता मानत नाही, त्या व्यक्तीला खरोखरच समजते. (3.27, 5.09, आणि 14.19 देखील पाहा.) (13.29) जेव्हा मनुष्य हे जाणतो विविध प्रकारचे जीव आहेत आणि ते सर्व एकाच परमात्म्याची रूपे आहेत आणि त्याच्यातूनच हे जीव निर्माण होतात तेव्हा तो परमात्म्याला मिळते. (13.30)

आत्म्याचे गुणधर्म

हे अर्जुना, जीव अनादी आहे आणि भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी अप्रभावित असल्यामुळे, चिरंतन परमात्मा --- जरी शरीरात सजीव अस्तित्व म्हणून वास करत असेल --- तरी काहीही करत नाही किंवा लिप्त होत नाही. (13.31) ज्याप्रमाणे सर्वव्यापी अवकाश त्याच्या सूक्ष्मतेमुळे लिप्त होत नाही; त्याचप्रमाणे, सर्व जीवांमध्ये स्थित आत्मा, देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. (13.32) ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो; त्याचप्रमाणे, हे अर्जुना, परमात्मा संपूर्ण क्षेत्र/शरीर प्रकाशित करतो (किंवा जीवन देतो). (13.33)

जे आत्म-ज्ञानाच्या चक्षूने क्षेत्र (किंवा शरीर) आणि क्षेत्रज्ञ (किंवा आत्म्या) यांच्यातील फरक जाणतात आणि दैवी मोह उर्जेच्या (माया) पाशातून (पाच मार्गांपैकी कोणत्याही मार्गाद्वारे --- नि: स्वार्थ सेवा) जीवाला (आत्म्याला) मुक्त करण्याचे तंत्र (निस्वार्थ सेवा, ज्ञान, भक्ती, ध्यान किंवा शरणागती या पाच पैकी एका मार्गाने) जाणतात ते परमात्म्याला प्राप्त होतात. (13.34)

14. प्रकृतीचे तीन गुण

परम भगवान म्हणाले: पुढे मी तुला सर्व ज्ञानातील परम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व षींनी या जीवनानंतर परम सिद्धी प्राप्त केली आहे. (14.01) ज्यांनी या अलौकिक ज्ञानाचा आश्रय घेतला आहे ते माझ्याबरोबर एकरूप होतात आणि सृष्टी निर्मितीच्या वेळी जन्म घेत नाहीत किंवा प्रलयाच्या वेळी व्याकूळ होत नाहीत. (14.02)

सर्व प्राणी आत्मा आणि पदार्थांच्या संगतीतून जन्माला येतात

हे अर्जुना, माझी भौतिक प्रकृती हे सृष्टीचे गर्भ आहे ज्यामध्ये मी शुद्ध बीज प्रदान करतो ज्यापासून सर्व प्राणी जन्माला येतात. (9.10 देखील पाहा.) (14.03) हे अर्जुना, वेगवेगळ्या गर्भामध्ये ज्या ज्या योनी तयार होतात, भौतिक प्रकृती ही त्यांना देह देणारी माता आहे; मी जीवन देणारा पिता आहे. (14.04)

भौतिक प्रकृतीचे तीन गुण आत्म्याचे शरीराशी बंधन कसे करतात

हे अर्जुना, सत्व किंवा चांगुलपणा; रज किंवा उत्कटता, कर्म; आणि तम किंवा अज्ञान, जडत्व --- भौतिक प्रकृतीचे हे तीन गुण (दोर्‍या, गुण) प्रत्येक जीवाच्या शरीरात आत्मा (जीव) बांधून ठेवतात. (14.05) यापैकी, सत्व गुण निर्मळ असल्यामुळे प्रकाशमय आणि चांगला आहे. हे पाप-मुक्त अर्जुना, सत्वगुण जीवाला आनंद आणि ज्ञानाच्या आसक्तीशी बद्ध करतात. (14.06) हे जाणून घे की रजोगुण असंख्य वासना आणि महत्त्वाकांक्षेमुळे उत्पन्न होतो. रजोगुणामुळे देहधारी जीव कर्मफलांशी बांधला जातो. (14.07) हे अर्जुना, हे जाणून घे की तमोगुण --- देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण --- जो जडत्वातून जन्माला आला आहे. तो जीवाला निष्काळजीपणा, आळशीपणा आणि अत्यधिक निद्रेने बद्ध करतो. (14.08) हे अर्जुना, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो (परमात्म्याबद्दल शिकणे आणि जाणून घेण्याच्या); रजोगुण सकाम कर्माशी जोडतो; आणि तमोगुण त्याचे आत्मज्ञान आवृत्त करून अज्ञानाशी जोडतो. (14.09)

प्रकृतीच्या तीन गुणांची वैशिष्ट्ये

हे अर्जुना, कधीकधी रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून करून सत्वगुण प्रमुख होतो; कधीकधी रजोगुण सत्त्व आणि तमोगुण यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्त्व आणि रजोगुणाचा पाडाव करतो. (14.10) जेव्हा आत्म-ज्ञानाचा प्रकाश शरीरातील सर्व संवेदना (किंवा दारे) प्रकाशित करतो, तेव्हा सत्त्वगुणाच्या प्रकटीकरण असते. (14.11) हे अर्जुना, जेव्हा रजोगुण प्रबल असतो तेव्हा, अति लोभ, क्रिया, सकाम कर्म, अस्वस्थता, उत्तेजना इ. उद्भवतात. (14.12) हे अर्जुना, तमोगुणाच्या प्रबल होण्याने, अज्ञान, निष्क्रियता, निष्काळजीपणा, भ्रम इ. उद्भवतात. (14.13)

आत्म्याच्या स्थानांतरणाची वाहने देखील त्रिगुण आहेत

जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो ऋषीमुनींच्या उच्चतर पवित्र स्वर्गादि लोकात जातो. (14.14) जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो. (किंवा उपयोग प्रधान). जेव्हा तमोगुणात मृत्यू होतो तेव्हा तो पशू योनीमध्ये पुनर्जन्म घेतो. (14.15) पुण्यकर्माचे फळ फायदेशीर आणि शुद्ध असल्याचे म्हटले जाते; रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दु:ख; आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे आळशीपणा. (14.16) सत्त्वगुणापासून आत्म-ज्ञान उत्पन्न होते; रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो; आणि तमोगुणापासून अज्ञान, मोह आणि मनाचा आळशीपणा उत्पन्न होतो. (14.17) सत्त्वगुणी मनुष्य स्वर्गात जातात; रजोगुणी या मुत्युलोकांत पुन्हा जन्म घेतात; आणि तमोगुणी मनुष्याचे, अज्ञानामध्ये राहून, अध:पतन होवून नीच जातीत किंवा नरकात जातात. (किंवा निम्न प्राणी म्हणून जन्म घेतात). (14.18)

भौतिक प्रकृतीचे तीन गुण ओलांडल्यानंतर निर्वाण मिळवा

जेव्हा मनुष्य योग्य रितेने पाहतो की (सर्व कर्मांचा) प्राकृतिक तीन गुणांखेरीज इतर कोणताही कर्ता नाही आणि जो या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तेव्हा तो मोक्ष प्राप्त करतो. (3.27, 5.09,  आणि 13.29 देखील पाहा) (14.19) जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबधीत या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास (किंवा वर उद्भवण्यास) समर्थ होतो तेव्हा तो जन्म, जरा आणि मृत्यूच्या वेदनांपासून मुक्त होवून याच जीवनात मोक्ष किंवा मुक्त होतो. (14.20)

तीन गुणांच्या वर येण्याची प्रक्रिया

अर्जुनाने विचारले: हे प्रभू, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? (14.21) श्री भगवान म्हणाले: हे अर्जुना, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करत नाही; जो प्रकृतीच्या त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचल आणि निश्चल राहतो; आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून परमेश्वरामध्ये स्थित राहतो, (14.22-23) जो सुखदुःखाला सारखेच मानतो; जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो; जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव रातो; ज्याचे मन स्थिर आहे आणि स्तुती व निंदा यामध्ये जो शांत राहतो; ज्याच्यासाठी मानापमान समान आहेत; जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने कर्तेपणाचा त्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. (14.24-25)

भक्तीयुक्त प्रेमाने तीन गुणांचे बंध कापले जाऊ शकतात

जो प्रेमाने आणि अतूट भक्तीने माझी सेवा करतो, तो भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांना पार करतो आणि ब्रह्मनिर्वाणासाठी पात्र होतो. (7.14 आणि 15.19 देखील पाहा) (14.26) कारण मी चिरंतन परमात्म्याचा, निरंतर व्यवस्था-धर्माचा आणि संपूर्ण सुखाचा आधार आहे. (14.27)

15. पुरूषोत्तम योग

सृष्टी ही मायेच्या सामर्थ्याने तयार केलेल्या वृक्षासारखे आहे

परम भगवान म्हणाले: असा एक शाश्वत अश्वत्थ वृक्ष/वटवृक्ष आहे, ज्याचे आदिपुरूष परमेश्वररूपी मूळ वरती आहे आणि (ब्रह्मदेवरूपी) शाखा खाली ब्रह्मांडामध्ये आहेत आणि ज्याची पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. (10.08 देखील पाहा) (15.01) मायेच्या(भ्रम) या दैवी वृक्षाच्या फांद्या सर्व जगामध्ये पसरल्या आहेत. या वृक्षाचे पोषण तीन गुणांद्वारे केले जाते; इंद्रिय सुख म्हणजे त्याचे अंकुर आहेत; आणि त्याची मुळे (अहंकार आणि इच्छा) मानवी जगात खाली पसरलेले, ज्यामुळे कार्मिक बंधने तयार होतात. (15.02)

आसक्तीचा वृक्ष कसा कापून मोक्ष प्राप्त करावा

या वृक्षाचे वास्तविक रूप या पृथ्वीवर अनुभवता येत नाही, किंवा याचा आदी, अंत आणि आधार जाणता येत नाही. मनुष्याने आत्मज्ञा आणि अनासक्तीच्या बळकट कुऱ्हाडीने या वृक्षाची खोलवर गेलेली मुळे --- अहंकार आणि वासना – छाटून टाकली पाहिजेत; असा विचार करावा की: "ज्याच्याकडून सर्व गोष्टींचा आरंभ झाला आहे त्या परमपुरूषाचा मी आश्रय घेतो", ज्या ठिकाणी गेल्यावर (नश्वर जगाकडे) पुन्हा परतावे लागणार नाही अशा परम निवासस्थानाचा शोध घ्यावा. (15.03-04) जे अभिमान आणि मोहातून मुक्त झाले आहेत, ज्यांनी आसक्तीच्या दुष्टतेवर विजय मिळविला आहे, जे भौतिक वासनेतून मुक्त झाले आहे, जे परमात्मामध्येच निरंतर वास करतात आणि सुख-दु:खाच्या द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत, ते ज्ञानी परमात्म्याला प्राप्त करतात. (15.05) त्या माझ्या (स्वयंप्रकाशी) परमधामाला सूर्य, चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करीत नाही. तेथे पोहोचल्यावर लोक मुक्ति प्राप्त करतात आणि पुन्हा या तात्कालिक जगात परत येत नाहीत. (13.17 आणि 15.12 देखील पाहा) (15.06)

मूर्त आत्मा आनंददायक आहे

सजीवांच्या शरीरातील सनातन आत्मा खरोखरच माझा अविभाज्य अंश आहे. तो मनासह --- सहा इंद्रियांशी एकत्रित होते आणि त्यांना सक्रिय करतो. (15.07) ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर फुलातील गंध घेवून जातो; त्याचप्रमाणे, आत्मा मृत्यूच्या वेळी सोडलेल्या भौतिक शरीरातून (कर्माच्या सामर्थ्याने) आत्मसात केलेल्या नव्या शरीरात सहा संवेदनांना घेवून जातो. (2.13 देखील पहा) (15.08) श्रवण, स्पर्श, दृष्टी, चव, गंध आणि मन या सहा संवेदनांचा वापर करून सजीव अस्तित्व (जीव) इंद्रिय उपभोग घेतो. शरीराचा त्याग करत असतांना, शरीरात राहत असतांना, किंवा विषयांचा भोग घेत असतांना, किंवा प्रकृतीच्या गुणांनी युक्त अशा त्या आत्मस्वरूपाला हे मूर्ख लोक पाहू शकत नाहीत. परंतु ज्यांच्याकडे आत्म-ज्ञानाचे चक्षू आहेत ते हे पाहू शकतात. (15.09-10) आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे योगीजन त्यांच्या आंतरिक मानसिकतेमध्ये (चैतन्य म्हणून) स्थित असलेले जिवंत अस्तित्व (जीव) पाहू शकतात, परंतु अज्ञानी लोक आणि ज्यांचे अंत:करण शुद्ध नाही, ते प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. (15.11)

आत्मा हा प्रत्येक गोष्टीचे सार आहे

हे जाणून घे की अखिल जगताचा अंध:कार नाहीसा करणारा सूर्यप्रकाश माझ्यापासून येतो आणि संपूर्ण जगाला प्रकाशित करतो आणि चंद्र आणि अग्नीचे तेजही माझ्यापासून येते. (13.17 आणि 15.06 देखील पहा) (15.12) मी पृथ्वीवर प्रवेश करतो, मी माझ्या सामर्थ्याने सर्व भूतांना धारण करतो. रस देणारा चंद्र होवून मी सर्व वनस्पतींचे पोषण करतो. (15.13) जठराग्नी होवून मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहतो. जीवनातील महत्वाची शक्ती (प्राण आणि अपान) वापरून मी सर्व प्रकारचे भोजन पचवतो. (15.14) आणि मी सर्व प्राण्यांच्या अंतरंगात स्थित आहे. माझ्यापासूनच स्मृती, आत्मज्ञान, आणि शंका आणि चुकीच्या कल्पना दूर होतात (परमात्म्याबद्दल युक्तिवाद करून किंवा संमोहनातून (समाधी)). वेदांच्या अभ्यासातून जाणले जाणारे सत्य मी आहे, मी खरोखर वेदान्ताचा कर्ता आणि वेदांचा जाणकार आहे. (हे देखील पहा 6.39) (15.15)

सर्वोच्च आत्मा, आत्मा आणि निर्मित प्राणी काय आहेत?

ब्रह्मांडात दोन अस्तित्व (किंवा पुरुष) आहेत: परिवर्तनीय किंवा ऐहिक दिव्य अस्तित्व (क्षर पुरुष), आणि अपरिवर्तणीय शाश्वत जीव (ब्रह्मा, अक्षर पुरुष). सर्व निर्मित प्राणी परिवर्तनीय आहेत, परंतु चिरंतन जीवात्मा अपरिवर्तणीय आहे. (15.16) क्षर आणि अक्षराच्या या दोहोंच्या पलीकडे परमात्मा आहे. त्याला परिपूर्ण सत्य किंवा परम परमात्मा असेही म्हणतात, जे क्षर आणि अक्षर अशा सर्व गोष्टी व्यापून त्यांचे पालनपोषण करतो. (15.17) कारण मी लौकिक आणि चिरस्थायी या दोन्हीही पलीकडे आहे, म्हणूनच मी या जगात आणि वेदात पुरूषोत्तम म्हणून ओळखला जातो (परब्रह्म, परमात्मा, पुरुषोत्तम, परिपूर्ण, सत्य, सत, दिव्यात्मा इ.). (15.18) हे अर्जुना! परमात्मा म्हणून मला खरोखर जाणणारा ज्ञानी, हा सर्व काही जाणतो आणि मनापासून माझी उपासना करतो. (7.14, 14.26 आणि 18.66 देखील पाहा) (15.19) म्हणून, हे निष्पाप अर्जुना, आत्म-ज्ञानाचे हे सर्वात गुप्त विज्ञान मी तुला सांगितले आहे. हे समजल्याने व्यक्ती ज्ञानी होते; एखाद्याची सर्व कर्मे पार पाडली जातात; आणि हे अर्जुना, मानवी जीवनाचे ध्येय साध्य केले जाते. (15.20)

16. दैवी आणि आसुरी गुणधर्म

तारणाकरिता जोपासल्या जाणाऱ्या प्रमुख दैवी गुणांची यादी

परम भगवान म्हणाले: निर्भयता, अंत:करणाची शुद्धता, आत्मज्ञानाचे अनुशीलन, दान, इंद्रियांचे दमन, त्याग, वेदाध्ययन, तपस्या, प्रामाणिकपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, संन्यास, शांतता, वाईट न बोलणे, सर्व प्राणिमात्रांसाठी करुणा, लोभविहीनता, सौम्यता, नम्रता, चंचलपणाची अनुपस्थिती, वैभव, क्षमा, दृढता, स्वच्छता, द्वेषाची अनुपस्थिती आणि अहंकाराची अनुपस्थिती --- हे अर्जुना, हे (सव्वीस) दैवी गुण आहेत. (16.01-03)

जे सोडायला हवे अशा आसुरी गुणांची यादी

हे अर्जुना, जे राक्षसी गुणांनी जन्मलेले आहेत त्यांची लक्षणे आहेत: ढोंगीपणा, घमेंड, गर्व, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञान. (16.04) दैवी गुण मुक्तीकडे नेतात (मोक्ष); आसुरी गुण बंधनकारक असल्याचे म्हटले जाते. हे अर्जुना, दु: खी होऊ नकोस; तू दैवी गुणांसह जन्मला आहेस. (16.05)

केवळ दोन प्रकारचे मनुष्य आहेत: शज्ञानी आणि अज्ञानी

मुळात, या जगात मनुष्य समुदायाचे फक्त दोन प्रकार किंवा जाती आहेत: दैवी आणि आसुरी. दैवीचे वर्णन यापूर्वीच मी केले आहे. आता हे अर्जुना, आसुरी गुणांचे वर्णन माझ्याकडून ऐक. (16.06) आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. त्यांच्याकडे अंतर्बाह्य शुद्धी, सदाचरण नाही आणि सत्यताही नाही. (16.07) ते म्हणतात की हे जग असत्य आणि निराधार आहे, परमेश्वर नामक कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. जग केवळ स्रीपुरुषांच्या संयोगातून उत्पन्न होते आणि म्हणून केवळ काम हेच जगाचे कारण आहे इतर काहीही नाही. (16.08) या चुकीच्या नास्तिक दृष्टिकोनाचे पालन केल्यामुळे, हे अध:पतित आत्मे - अल्पबुद्धीने आणि क्रूर कृतीने --- जगाच्या विनाश करण्यासाठी शत्रू म्हणून जन्माला येतात. (16.09) कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेवून, ढोंगीपणा, गर्विष्ठपणा आणि उद्धटपणाने भरलेले; भ्रमामुळे चुकीचे मते असणारे; ते अपवित्र हेतूंनी कार्य करतात. (16.10) मृत्यूपर्यंत अविरत चिंतेने वेढलेले, विषयभोग करणे हेच त्यांचे सर्वोच्च उद्दीष्ट लक्षात घेवून, त्यांची खात्री पटते की विषयभोग म्हणजे सर्वकाही आहे; (16.11)

हजारो इच्छांनी बद्ध झालेले आणि वासनेचेक्रोधाचे गुलाम बनलेले हे आसुरी लोक विषयभोग मिळविण्याकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. त्यांना वाटते: (16.12) आज मी इतकी संपत्ती मिळविली आहे; मी ही इच्छा पूर्ण करेन; माझ्याकडे खूप संपत्ती आहे आणि भविष्यात मी अधिक संपत्ती मिळवणार आहे; (16.13) त्या शत्रूला मी ठार मारले आहे. आणि इतरांनाही ठार मारीन. मी ईश्वर आहे. मी भोक्ता आहे. मी यशस्वी, सामर्थ्यवान आणि सुखी आहे; (16.14)

मी श्रीमंत आहे आणि एका श्रीमंत कुळात जन्माला आलो आहे. माझ्यासारखे आणखी कोण आहे? मी यज्ञ करीन, मी दान करीन आणि मी मौजमहा करीन. (16.15) अशा प्रकारे अज्ञानाने भ्रमित झालेले, अनेक कल्पनेने भ्रांत चित्त झालेले आणि भ्रमांच्या जाळ्यात अडकलेले, विषयभोगाच्या अधीन गेलेले आसुरी लोक नरकामध्ये पडतात. (16.16) स्वत:ला श्रेष्ठ मानणारे, हट्टी, गर्विष्ठ आणि श्रीमंतीच्या नशेत असलेले हे आसुरी लोक शास्त्रीय विधीविधानांचे पालन न करता, केवळ नाममात्र यज्ञ (दान, यज्ञ इ.) करतात. (16.17) हे द्वेषयुक्त लोक अहंकार, शक्ती, उद्धटपणा, वासना आणि क्रोधाला चिकटून राहतात; आणि त्यांच्या स्वत: च्या शरीरामधील आणि इतरांच्या शरीरामधील माझे अस्तित्त्व नाकारतात. (16.18)

दुःख हे अज्ञानींचे नशिब असते

या द्वेषी, क्रूर, पापी आणि नराधमाना मी पुन्हा पुन्हा आसुरी योनींत पुनर्जन्माच्या चक्रात टाकत असतो. (16.19) हे अर्जुना, आसुरी योनींत वारंवार जन्म प्राप्त करून, कधीही माझ्याकडे येवू शकत नाहीत आणि अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. (16.20)

काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत

काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत, यांमुळे आत्म्याचे पतन होते (किंवा आत्मा गुलाम होतो). म्हणूनच, एखाद्याने या तिघांना त्याग केला पाहिजे. (16.21) हे अर्जुना, जो या नरकाच्या या तीन द्वारांमधून सुटला आहे तो, जे चांगले करतो आहे ते करतो आणि परिणामी परम धामाला प्राप्त होतो. (16.22)

एखाद्याने शास्त्राचे अनुसरण केले पाहिजे

जो आपल्या इच्छेच्या प्रभावाखाली कार्य करतो, शास्त्रीय आज्ञेचे उल्लंघन करतो त्याला सिद्धि किंवा सुख मिळू शकत नाही किंवा परमधामही प्राप्त होत नाही. (16.23) म्हणून, काय केले पाहिजे आणि काय करू नये हे ठरविण्यासाठी पवित्र शास्त्र हा आधार घेतला पाहिजे. शास्त्रविधीद्वारे मनुष्याने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. (16.24)

17. श्रद्धेचे तीन प्रकार

अर्जुन म्हणाला: हे कृष्णा, जे शास्रविधींचे पालन करता, श्रध्देने आध्यात्मिक पूजन करतात त्यांच्या श्रध्देचा गुण कोणता असतो? सत्त्व, रज की तम? (17.01)

श्रद्धेचे तीन प्रकार

परमेश्वर म्हणाले: देहधारी आत्म्याची नैसर्गिक श्रद्धा तीन प्रकारची असते: सात्विकी, राजसी आणि तामसी. आता हे माझ्याकडून ऐका. (17.02) हे अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक स्वभावानुसार असते (कार्मिक बंधनाद्वारे शासित). एखाद्या व्यक्तीला जे काही बनण्याची इच्छा असेल ती ते होऊ शकते. (जर एखादी व्यक्ती श्रध्देने सतत त्याअनुरूप विचार करत असेल तर). (17.03) सात्विक मनुष्य देवतांची उपासना करतात; राजसिक मनुष्य यक्ष आणि राक्षसांची यांची उपासना करतात; आणि तामसिक मनुष्य भूतप्रेतांची उपासना करतात. (17.04) जे ढोंगीपणा आणि अहंकारांने, धर्मग्रंथांच्या नियमांचे पालन न करता कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात आणि त्यांच्या शरीरातील घटकांचा मूर्खपणाने छळ करतात आणि जो शरीरात राहणाऱ्या मलाही कष्ट देतात, त्यांना आसुरी प्रवृत्तीचे तामसिक लोक म्हटले जाते. (17.05-06)

अन्नाचे तीन प्रकार

त्याग, तपस्या आणि दानधर्म यांच्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो. आता त्यांच्यातील भेद ऐक. (17.07) दीर्घायुष्य, सद्गुण, सामर्थ्य, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करणारा आहार रसयुक्त, स्निग्ध, भरीव आणि पौष्टिक असतो. अशा प्रकारचे अन्न सात्व्विक मनुष्यांना आवडते. (17.08) रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दु: ख, शोक आणि व्याधी निर्माण करतो. (17.09) शिळे, बेचव, नासलेले, कुजलेले, उष्टे आणि अपवित्र (जसे मांस आणि दारू) असे अन्न तमोगुणी लोकांना अधिक प्रिय असते. (17.10)

तीन प्रकारचे यज्ञ

पवित्र शास्त्रांद्वारे सांगण्यात आलेली आणि फलाची आकांक्षा न बाळगता, कर्तव्य आहे याची दृढ श्रद्धा आणि दृढ निश्चयाने केलेला यज्ञ सात्विक यज्ञ आहे. (17.11) हे अर्जुना, दंभार्थ आणि भौतिक लाभ प्राप्तीच्या हेतूने केलेला यज्ञ राजसिक यज्ञ असतो. (17.12) शास्त्राचे अनुसरण न करता, ज्यामध्ये प्रसाद वितरीत केला जात नाही, जो मंत्र, श्रद्धा आणि दक्षिणेशिवाय केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. (17.13)

विचार, शब्द आणि कृती यांची तपस्या

भगवंत, ब्राह्मण, गुरु आणि विद्वानांची उपासना; शुद्धता, प्रामाणिकपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा --- यांना शारिरीक तप म्हटले आहे. (17.14) इतरांना क्षुब्ध न करणारे, सत्य, प्रिय, हितकारक आणि वेदपठणासाठी - जपासाठी वापरले जाणारे शब्द म्हणजे वाचिक तपस्या. (17.15) मनाची प्रसन्नता, सौम्यता, शांतता, आत्मसंयम आणि विचारांची शुद्धता --- म्हणजे मानसिक तप म्हणतात. (17.16)

तीन प्रकारची तपस्या

उपरोक्त उल्लेखित तीनही तपस्या (विचार, शब्द आणि कृती) योगींनी फळांची इच्छा न करता परम श्रद्धेने केली असता, त्या तपाला सात्विक तप असे म्हणतात. (17.17) आदर, सन्मान, परम आदर व्हावा म्हणून आणि दंभाने, एक अनिश्चित आणि क्षणिक परिणाम मिळविण्याकरिता जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप म्हणतात. (17.18) आत्म पीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ मूर्खपणे जे तप केले जाते त्यास तामसिक तप असे म्हणतात. (17.19)

तीन प्रकारचे दान

कर्तव्य म्हणून व्यक्तीला योग्य स्थळी आणि वेळी, प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हणतात (17.20) जे दान अनिच्छेने, प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फलाची अपेक्षा ठेवून दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हणतात. (17.21) अयोग्य स्थळी आणि वेळी, अपात्र व्यक्तींना किंवा प्राप्तकर्त्याचा आदर न करता किंवा अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हणतात. (17.22)

भगवंताची तीन नावे

 ओम तत् सत्’ हे तीन शब्द परमात्म्याचे नाव असल्याचे म्हटले जाते. सद्गुणी लोक, वेद आणि निस्वार्थ सेवा हे सृष्टीच्या आरंभी ब्रह्माद्वारे तयार केले गेलेले आहेत. (17.23) म्हणून धर्मग्रंथात सांगितलेले त्याग, दानधर्म आणि तपस्या ही कृत्ये परमात्माच्या जाणकारांकडून नेहमीच ‘ओम’ उच्चारून आरंभ केली जातात. (17.24) मुक्तीची(मोक्ष) इच्छा करणाऱ्या मनुष्याने विविध प्रकारचे यज्ञ, दानधर्म आणि तपस्या यातत्’ (किंवा तो सर्व आहे) शब्दांद्वारे कराव्यात. (17.25) ‘सत्’ हा शब्द परम सत्य आणि सात्विकता या अर्थाने वापरला जातो. ‘सत्’ या शब्दाचा प्रयोग शुभ कार्यासाठीसुद्धा केला जातो. (17.26) त्याग, दानधर्म आणि तपस्यांवरील श्रद्धा (आस्तिक बुद्धी) याला देखीलसत्’ असे म्हणतात. परमार्थाप्रति नि:स्वार्थ सेवा ही खरे तर ‘सत्’ म्हणून ओळखली जाते. (17.27) श्रध्देविना जे काही केले जाते --- ते त्याग, दान, तपस्या किंवा इतर कोणतीही कृत्य असो --- त्याला ‘असत्असे म्हणतात. हे अर्जुना, ते या जन्मी किंवा पुढील जन्मातही व्यर्थच ठरते. (17.28)

18. अहंकाराचा त्याग करून मुक्ती मिळवणे

अर्जुन म्हणाला: हे परमेश्वरा कृष्ण, मला संन्यास आणि त्याग यांचे स्वरूप आणि दोघांमधील फरक जाणून घ्यायचा आहे. (18.01)

संन्यास आणि त्याग यांची परिभाषा

परात्पर भगवान म्हणाले: वैयक्तिक लाभासाठी आधारलेल्या कर्माच्या त्यागाला ऋषीजन संन्यास म्हणतात. सर्व कर्माच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धीमान लोक त्याग असे म्हणतात. (5.01, 5.05 आणि 6.01 देखील पाहा) (18.02) काही तत्वज्ञ म्हणतात की सर्व कर्मे दोषपूर्ण आहे आणि त्यांचा त्याग करायला हवा, तर काही लोक म्हणतात की त्याग, दानधर्म आणि तपस्या अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये. (18.03)

हे अर्जुना, त्यागाबद्दलचा माझा निष्कर्ष ऐक. त्याग तीन प्रकारचा असल्याचे सांगितले जाते. (18.04) यज्ञ, दान व तपस्या या कर्मांचा त्याग केला जावू नये, तर यज्ञ, दान व तपस्या हे केलेच पाहिजेत कारण ते महात्म्यांना देखील पवित्र करतात. (18.05) ही अनिवार्य कर्मे देखील फलांच्या आसक्तीशिवाय केली पाहिजेत. हे अर्जुना, माझा निश्चित सर्वोच्च सल्ला आहे. (18.06)

तीन प्रकारचे त्याग

नियत कर्मांचा त्याग करणे योग्य नाही. मोहवश होवून जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग म्हटले जाते. (18.07) जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीपोटी त्याग करतो, त्याने रजोगुणात त्याग केलेला असतो. अशा त्यागाचे लाभ मिळत नाही. (18.08) हे अर्जुना, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करतो, त्यावेळी तो त्याग सात्विक समजावा. (18.09) जो अमान्य कर्मांचा द्वेष करत नाही आणि मान्य कर्मांत आसक्त राहत नाही असा मनुष्य सत्त्वगुणात स्थित त्यागी असतो, तो बुद्धिमान असतो आणि परमात्म्याविषयी कोणताही संशय त्याच्याकडे नसतो. (18.10) मनुष्य कर्मापासून पूर्णपणे दूर राहू शकत नाही. म्हणूनच, जो सर्व कर्मफलांच्या स्वार्थी आसक्तीचा त्याग करतो, त्याला एक त्यागी मानले जाते. (18.11) कर्म फलांचा त्याग न करणाऱ्या मनुष्याला त्याच्या मृत्यू नंतर इष्ट, अनिष्ट आणि मिश्र --- असे तीन प्रकारचे कर्मफल प्राप्त होते पण त्यागी मनुष्याला कर्मफलांचे फल मिळत नाही.  (18.12)

कर्माची पाच कारणे

हे, अर्जुना, सांख्ययोगामध्ये वर्णन केल्याप्रमाणे सर्व कर्माच्या पूर्तीसाठी पाच कारणे सांगितली आहेत. माझ्याकडून ती जाणून घे. ती आहेत: भौतिक शरीर, कर्माचे स्थान; प्रकृतीचे गुण, कर्ता;  समज आणि कृतीची अकरा इंद्रिये, साधने; विविध प्राण (जैविक चेतना, जीवन शक्ती); आणि पाचवा अधिष्टातरी देवता (अकरा अवयवांपैकी). (18.13-14) शरीराने, वाचेने किंवा मनाने केलेल्या कोणत्याही कर्माची ही पाच कारणे आहेत, मग ते योग्य किंवा अयोग्य असो (18.15) म्हणून, अज्ञानी, ज्याला वाटते की एखाद्याचे शरीर किंवा आत्मा हे एक आहेत, त्याला अपूर्ण ज्ञानामुळे काहीही समजत नाही. (18.16) जो स्वत:ला कर्ता मानत नाही आणि ज्याची बुद्धी कर्माच्या फलाच्या लाभाने दूषित झालेली नाही --- या सर्व लोकांना ठार मारुनही तो --- मारेकरी होत नाही किंवा मारण्याच्या कृतीने बांधला जात नाही. (18.17) ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही कर्माला प्रेरणा देणारी तीन कारणे आहेत. समज आणि कृतीची अकरा इंद्रिये, कर्म आणि प्रकृतीचे गुण हे क्रियेचे तीन घटक आहेत. (18.18)

तीन प्रकारचे ज्ञान

सांख्य योगाच्या गुणांच्या सिद्धांतानुसार म्हटले जाते की आत्मज्ञान, कर्म आणि कर्ता असे तीन प्रकार आहेत. याविषयी विधिवतपणे ऐक (18.19) ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त सत्य दिसून येते त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान म्हणतात. (11.13 आणि 13.16 देखील पाहा) (18.20) ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा भाव पाहतो ते ज्ञान राजस होय. (18.21) अतार्किक, निराधार आणि निरुपयोगी ज्ञान ज्याद्वारे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व मानतो (जसे की शरीरातच) जणू काही ते शरीर हेच सर्व तेच काही आहे, असे ज्ञान तमोगुणी असते. (18.22)

कर्माचे तीन प्रकार

जे कर्म नेमलेले आहे, जे राग-द्वेष न ठेवता केले जाते, स्वार्थी हेतू न ठेवता केले जाते आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. (18.23) अहंकाराने, स्वार्थाच्या हेतूने आणि मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते ते रजोगुणी कर्म होय. (18.24) जे कर्म मोहाने, परिणामांची पर्वा न करता, इतरांना तोटा,क्लेशदायक, तसेच स्वत: च्या क्षमतेकडे दुर्लक्ष केल्याने केले जाते ते तामसिक कर्म होय. (18.25)

कर्त्याचे तीन प्रकार

जो मनुष्य आसक्तीपासून मुक्त आहे, मिथ्या अहंकारविना, निश्चयाने आणि उत्साहाने संपन्न आहे आणि यशापयशामध्ये विचलीत होत नाही त्याला सात्विक कर्ता म्हणतात. (18.26) जो कर्ता उत्कट आहे, कर्मफलांची इच्छा करतो, जो लोभी, हिंसक, अपवित्र आहे आणि सुख-दु;खामध्ये विचलीत होतो त्याला रजोगुणी कर्ता म्हणतात. (18.27) बेशिस्त, अश्लील, हट्टी, दुष्ट, द्वेषपूर्ण, आळशी, उदासीन आणि व्याकुळ कर्त्याला तमोगुणी कर्ता म्हटले जाते. (18.28)

बुद्धीचे तीन प्रकार

हे अर्जुना, प्रकृतीच्या तीन गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे तीन प्रकार आता मी तुला तपशीलवार सांगत आहे. (18.29) हे अर्जुना, जी बुद्धी प्रवृत्ती आणि निवृत्ती (संन्यास) हे मार्ग जाणते, कर्म आणि अकर्म, भय आणि अभय, बंधन आणि मोक्ष जाणते, ती सात्विक बुद्धी होय. (18.30) हे अर्जुना, जी बुद्धी धर्म आणि अधर्म आणि कर्म आणि अकर्म यांमध्ये फरक जाणू शकत नाही, ती राजसिक बुद्धी होय! (18.31) अज्ञानाच्या प्रभावामुळे जी बुद्धी अधर्माला धर्म म्हणून समजते आणि सर्वकाही जे नसते तेच समजते, हे अर्जुना ती म्हणजे तामसिक बुद्धी! (18.32)

तीन प्रकारचे संकल्प आणि मानवी जीवनाची चार उद्दीष्टे

हे अर्जुना असा निश्चय की ज्यायोगे मनुष्य मनाची कार्ये, प्राण (जैविक चेतना, जीवन शक्ती) आणि इंद्रिये केवळ ईश्वर-प्राप्तीसाठी संयमित करतो,तो सात्विक निश्चय होय. (18.33) ज्या निश्चयाने मनुष्य कर्म फलांप्रति आसक्त असतो, नियत कर्म(धर्म), संपत्ती मिळवते (अर्थ) आणि सुख (काम) यांना आसक्त असतो ते राजसिक निश्चय होय. (18.34) ज्या निश्चयामुळे एक निस्तेज मनुष्य झोप, भीती, शोक, कुतूहल आणि निष्काळजीपणा यांचा त्याग करू शकत नाही, हे अर्जुना तो तामसिक निश्चय होय! (18.35)

सुखाचे तीन प्रकार

आणि आता, अर्जुना, माझ्याकडून सुखाच्या तीन प्रकारांबद्दल ऐक. अध्यात्मिक अभ्यासामुळे प्राप्त होणाऱ्या सुखाला की ज्यामुळे सर्व दु:खे नाहीशी होतात ते सात्विक सुख होय. (18.36) जे आरंभी विषासमान प्रतीत होते, परंतु शेवटी अमृततुल्य असते, आत्म-ज्ञानातून जे उत्पन्न होते ते सात्विक सुख म्हटले आहे. (18.37) इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते, त्या सुखाला राजसिक सुख म्हटले आहे. (5.22 देखील पाहा) (18.38) झोप, आळशीपणा आणि निष्काळजीपणाच्या परिणामी आरंभापासून शेवटपर्यंत जे सुख मोहमयी असते ते तामसिक सुख आहे. (18.39) पृथ्वीवर किंवा स्वर्गातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो या भौतिक प्रकृतीच्या या तीन गुणांपासून मुक्त राहू शकतो. (18.40)

श्रम विभागणी व्यक्तीच्या क्षमतेवर आधारित आहे

हे अर्जुना, श्रमांचे चार विभाग (किंवा वर्ण) आहेत --- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र --- मध्ये विभागणी ही लोकांच्या प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न होणाऱ्या त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. (किंवा नैसर्गिक प्रवृत्ती, आणि एखाद्याचा जन्मसिद्ध हक्क म्हणून केलेली नाही). (4.13 देखील पाहा) (18.41) शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, अलौकिक ज्ञान, दिव्य अनुभव आणि देवावर विश्वास असलेल्या बुद्धीवंताना ब्राह्मण म्हटले जाते. (18.42) नायकाचे गुण, शौर्य, जोम, दृढता, कौशल्य, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि प्रशासकीय कौशल्ये हे गुण असणाऱ्यांना क्षत्रिय किंवा रक्षक म्हणतात. (18.43) जे कृषी, गोपालन, व्यवसाय, व्यापार आणि उद्योगात चांगले आहेत त्यांना वैश्य म्हणून ओळखले जाते. जे लोक सेवा आणि श्रम चांगले करतात त्यांना शूद्र म्हणून वर्गीकृत केले जाते. (18.44)

कर्तव्य, शिस्त आणि भक्तीद्वारे मोक्ष मिळविण्याचा प्रयत्न

आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सर्वोच्च सिद्धी मिळवू शकते. आपापल्या कार्यामध्ये व्यस्त असतानाही सिद्धी कशी प्राप्त करता येते ते ऐक. (18.45) सर्व जीवांचा उत्पत्ती आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून, मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे परम सिद्धी प्राप्त करू शकतो. (9.27, 12.10 देखील पाहा) (18.46) मनुष्याने आपले स्वत:ची निकृष्ट दर्जाची कर्म चांगल्या रितीने केलेल्या दुसऱ्याच्या अधिक चांगल्या कर्मापेक्षा श्रेष्ठ असतात. मनुष्याला त्याच्या स्वत: च्या अंतर्निहित स्वभावानुसार नियुक्त करण्यात आलेले कर्म कधीच पापाने (किंवा कार्मिक प्रतिक्रिया) प्रभावित होत नाही. (3.35 देखील पाहा) (18.47) ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो, त्याप्रमाणे हे अर्जुना, सर्व कर्मे कोणत्या न कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून एखाद्याने त्याचे नैसर्गिक कर्म, जरी सदोष असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. (18.48) ज्याचे मन स्वार्थी आसक्तीपासून मुक्त असते, ज्याने मन व इंद्रियांना नियंत्रित केले आहे आणि जो सर्व इच्छांपासून मुक्त आहे, तो कर्मफलांच्या स्वार्थी आसक्तीचा त्याग करून कर्म बंधनातून मुक्तता देणारी परमपूर्ण अवस्था प्राप्त करतो. (18.49)

हे अर्जुना, माझ्याकडून थोडक्यात शिकून घे की अशी परिपूर्णता एखादा मनुष्य कशा प्रकारे प्राप्त करतो (किंवा कर्माच्या बंधनातून मुक्तता) परमपुरुषाला प्राप्त होतो, की जे अलौकिक ज्ञानाचे ध्येय आहे. (18.50) आपल्या बुद्धीने पूर्ण शुद्ध होवून आणि निश्चयाने मनोनिग्रह करून, ध्वनी आणि इंद्रियतृप्तीच्या इतर विषयांचा त्याग करून, आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होवून जो एकांतात राहतो; मिताहार घेतो; आपली मन, वाचा आणि काया संयमित करतो; सतत ध्यान योगामध्ये तल्लीन राहतो; अनासक्त राहतो; तसेच अहंकार, हिंसा, गर्व, वासना, क्रोध आणि स्वामित्त्वभावनेचा त्याग करतो --- तेव्हा तो शांत असतो, “मी” आणि “माझा” या भावनेपासून मुक्त होतो आणि परमात्म्याबरोबर एकरूप होण्यासाठी पात्र होतो. (18.51-53) परमात्म्यात एकरूप झालेला मनुष्य, कशाचाही शोक करत नाही किंवा त्याला कशाचीही आकांक्षा नसते. तो सर्व प्राणीमात्रांप्रति समभाव ठेवतो, तो व्यक्ती माझी विशुद्ध भक्ती, परा भक्ती प्राप्त करतो. (18.54) परा भक्तीद्वारे मनुष्य जाणू शकतो की मी काय आहे आणि मी कोण आहे. माझे खरे स्वरूप समजून घेतल्यानंतर, मनुष्य माझ्यामध्ये एकरूप होतो. (5.19 देखील पाहा) (18.55)

एक कर्मयोगी भक्त - सर्व कर्मे करीत असतानाही - केवळ माझा आश्रय घेवून (प्रेमळ भक्तीने मला सर्व कर्मे मला अर्पण करून) माझ्या कृपेने --- निरंतर अनंत धाम, मोक्ष प्राप्त करतो. (18.56) सर्व कर्मे मला मनापासून अर्पण कर, मला आपले सर्वोच्च लक्ष्य मान आणि पूर्णपणे माझा आश्रय घे. नेहमी माझ्यावर आपले मन केंद्रित कर आणि कर्मयोगाचा आश्रय घे. (18.57) जेव्हा तुझे मन माझ्यावर स्थिर होईल, तेव्हा माझ्या कृपेने तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. परंतु, अहंकाराने माझे म्हणणे नाकारल्यास तुझा नाश होईल. (18.58)

कार्मिक बंधन आणि मुक्त इच्छा

जर तुझ्या अहंकारामुळे तू विचार केला की: मी युद्ध करणार नाही, तर तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा स्वत:चा स्वभावच तुला युद्धामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करेल. (18.59) हे अर्जुना, तुझ्या स्वत:च्याच कार्मिक बंधनातून (किंवा संस्कार) उत्पन्न होणाऱ्या स्वभावजन्य कर्माद्वारे तू नियंत्रित आहेस. म्हणून, तुझ्या --- इच्छेविरुद्ध देखील--- मोहवश होवून तुला जे करावेसे वाटत नाही,ते तू करशील. (18.60) परात्पर भगवान, कृष्ण, सर्व प्राण्यांच्या अंत:करणात नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत, ज्यामुळे प्राणी मायेने बनविलेल्या शरीररूपी यंत्रावरील (कर्माच्या) बाहुल्यांप्रमाणे वागतात (किंवा त्यांचे कर्म करतात). (18.61) हे अर्जुना, प्रेमळ भक्तीनेच परमात्म्यामध्ये शरण जा. त्याच्या कृपेने तुला सर्वोच्च शांती व शाश्वत धाम प्राप्त होईल. (18.62) अशाप्रकारे, मी अत्याधिक गुह्य ज्ञान तुला सांगितले आहे. यावर तू पूर्णपणे विचार केल्यानंतर, तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. (18.63)

शरण जाणे हाच परमात्म्याकडे जाण्याचा अंतिम मार्ग आहे

पुन्हा एकदा माझे सर्वात गुप्त, सर्वोच्च शब्द ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस; म्हणून मी हे तुझ्याच हितासाठी सांगत आहे. (18.64) तुझे मन माझ्यावर केंद्रित कर, माझा भक्त हो, माझी सेवा कर. मला नमन कर, आणि मग तू नक्कीच मला प्राप्त होशील. मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो कारण तू माझा प्रिय सखा आहेस. (18.65) सर्व कर्मे बाजूला ठेवून (कर्तेपण, मालकी आणि कर्मफलांबद्दल आसक्ती) फक्त मलाच शरण ये - किंवा आनंदाने माझ्या इच्छेचे पालन कर. मी तुला मुक्त करेल (सर्व पाप किंवा कर्मा बंधनातून). शोक करू नको. (18.66)

सर्व कर्तव्ये सोडून परमेश्वराचा आश्रय घेण्याचा अर्थ असा आहे की, एखाद्याने स्वत: च्या आसक्तीविना कर्तव्य बजावले पाहिजे, ज्याचा परिणाम परमेश्वराला अर्पण म्हणून झाला पाहिजे आणि केवळ त्याच्यावरच मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी अवलंबून असले पाहिजे. जो मनुष्य जे खऱ्या आत्मसमर्पण करण्याच्या भावनेने त्याच्यावर पूर्णतः अवलंबून असतो अशा मनुष्याची पूर्ण जबाबदारी परमेश्वरावर अवलंबून असते.

परमेश्वराची सेवा आणि सर्वोत्तम दान

जो तप करत नाही, जो भक्त नाही, ज्याला ऐकायला आवडत नाही किंवा जो माझ्याविषयी वाईट बोलतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. (18.67) जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य तत्वज्ञानाचा (गीतेचा प्रसार करण्यास) प्रसार किंवा प्रचार करण्यास मदत करेल, तोच माझी सर्वोच्य भक्ती सेवा करेल आणि निश्चितच (सर्वोच्च निवासस्थानाला प्राप्त होईल आणि) माझ्याकडे येईल . (16.68) त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. (18.69)

गीतेतील ज्ञान

जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. (18.70) जो कोणी श्रध्देने व द्वेष न करता श्रवण करतो किंवा वाचतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि उच्चलोक प्राप्त करतो – पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. (18.71) हे अर्जुना, तू हे एकाग्रचित्ताने श्रवण केलेस ना? तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? (18.72)  अर्जुन म्हणाला: तुमच्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आहे; मी आत्मज्ञान प्राप्त केले आहे; माझा गोंधळ (शरीर आणि आत्म्याच्या संदर्भात) दूर झाला आहे; आणि मी तुमच्या आज्ञेनुसार कर्म करेन. (18.73) संजय म्हणाला: अशा प्रकारे भगवान कृष्ण आणि महात्मा अर्जुनामधील हा अद्भुत आणि रोमांचकारी संवाद मी ऐकला आहे. (18.74) (गुरु) ऋषी व्यासांच्या कृपेने, मी हे परमगुह्य ज्ञान आणि सर्वोच्च योग थेट योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून ते (अर्जुनाला) साक्षात सांगताना ऐकला आहे. (ऋषी व्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टी मुळे). (18.75) हे राजन, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील या अद्भुत आणि पवित्र संवादाचे पुन्हा पुन्हा स्मरण होवून मला प्रतिक्षण हर्ष होत आहे. (18.76) हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे ते अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक हर्षोल्हासित होत आहे. (18.77)

ज्ञान आणि कर्म दोन्ही आवश्यक आहेत

जेथे जेथे योगेश्वर कृष्ण, (किंवा धर्मग्रंथांच्या रूपात धर्म) आणि कर्तव्य आणि संरक्षणासाठी शस्त्रसज्ज झालेले अर्जुन असतील तेथे सार्वकालिक संपन्नता, विजय, आनंद आणि नैतिकता असेल. हा माझा विश्वास आहे. (18.78)

अशा प्रकारे भगवद्-गीता समाप्त

 

हे पुस्तक भगवान श्री कृष्णाला अर्पण केले आहे.

तो आपल्या सर्वांना आशीर्वाद, समृद्धी आणि शांती प्रदान करो.

ओम तत् सत्

इंग्रजीमधून अनुवादित

अनुवादक: अमृता अनिल कुलकर्णी

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||